Free Silai Machine Yojana sakal
अर्थविश्व

सरकारकडून महिलांना शिलाई मशीन, ग्रामीण भागातील महिला होणार सक्षम

केंद्र सरकार दुर्बल घटकांसाठी अनेक योजना आणतात. आर्थिकदृष्ट्या या घटकांना प्रबळ करण्याच्या हेतूने या योजना असतात.

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकार दुर्बल घटकांसाठी अनेक योजना आणतात. आर्थिकदृष्ट्या या घटकांना प्रबळ करण्याच्या हेतूने या योजना असतात. अश्याच एका योजनेद्वारे सरकारने घरगुती आणि दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यास सुरुवात केली आहे.

घरगुती आणि आर्थिक दुर्बल महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांच्या प्रगतीला यातून चालना मिळणार आहे. (central government is bringing a new scheme for women they will get silai machine)

या योजनेचा उद्देश शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे. देशातील सर्व महिलांना या योजनेचा फायदा होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे. ज्या महिला अत्यंत गरीब आहेत अशा सर्व महिलांसाठी सरकार शिलाई मशीन योजना आणत आहे, जेणेकरून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे आणि महिलांना घराबाहेर न पडता आरामात घरी बसून कमाईचा लाभ घेता येईल.

या योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील ५० हजारांहून अधिक महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देणार आहे. ही योजना हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये सुरू होणार असून या अंतर्गत महिलांना रोजगार मिळणार.

शिलाई मशीन मोफत मिळण्यासाठी महिलांना अर्ज करावा लागतो. या योजनेद्वारे श्रमिक महिला मोफत शिलाई मशीन मिळाल्यानंतर स्वत:चा उदर्निवाह करता येणार.

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन दर महिन्याला चांगली कमाई करता येते. मोफत शिलाई मशीन गरीब आणि कष्टकरी महिलांना आत्मनिर्भर बनवून रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. या मशीनमुळे महिला कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतात. जर तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील.

1.या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे वय २० ते ४० वयोगटातील असणं बंधनकारक आहे.

2. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

3.अर्जासोबत आधार कार्ड, जन्मदाखला, आयकर प्रमाणपत्र, ओळखपत्र, दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र, शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो असणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT