Ashneer Grover esakal
अर्थविश्व

आयुष्यात पुन्हा कधीही इनव्हेस्टर्सचा गुलाम बनणार नाही : अश्नीर ग्रोव्हर

फिनटेक युनिकॉर्नला पाठवलेल्या राजीनाम्यात अश्नीर ग्रोव्हर यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

शिल्पा गुजर

फिनटेक युनिकॉर्नला पाठवलेल्या राजीनाम्यात अश्नीर ग्रोव्हर यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.

अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी अनेक दिवसांच्या वादानंतर अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फिनटेक भारतपेच्या (Fintech BharatPe) एमडी (MD) पदाचा ग्रोव्हर यांनी राजीनामा दिला. फिनटेक युनिकॉर्नला पाठवलेल्या राजीनाम्यात अश्नीर ग्रोव्हर यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. मजबुरीमुळे हा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या कंपनीचा मी संस्थापक आहे, आज मला त्या कंपनीचा निरोप घेण्यास भाग पाडले जात आहे. याचे खूप दुःख झाल्याचे अश्नीर ग्रोव्हर यांनी फिनटेक युनिकॉर्नच्या बोर्डाला पाठवलेल्या मेलमध्ये असे लिहिले आहे.

भारतपेच्या बोर्ड आणि व्यवस्थापनाशी अनेक आठवड्यांच्या संघर्षानंतर अश्नीर ग्रोव्हरने कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनी सोडण्यासाठी त्यांनी 4,000 कोटी रुपये मागितले होते. कंपनी त्यांना हे पैसे देणार आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. पण मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीतून ग्रोव्हर यांनी काही गोष्टींचा खुलासा केला आहे, त्यावर एक नजर टाकुयात.

- आपल्यावर अतिशय खोटे आणि तकलादू आरोप केल्याचे ग्रोव्हर म्हणाले. टर्मिनेशन लेटरमध्ये लेझर उपचार करण्याचा उल्लेख आहे. माझ्या पत्नीला त्वचेची समस्या असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. त्याचे बिल ड्रॉव्हरमध्ये पडून होते, त्याचे पैसे माझ्या पत्नीने भरलेही होते. पण हेच बिल आम्ही कंपनीकडून क्लेम केल्याचे त्यांचे म्हणणे आहे, जो की अतिशय खोटा आरोप असल्याचे ग्रोव्हर यांनी सांगितले.

- राजानाम्यानंतर पुढे काय करणार हे सांगायची इच्छा नसल्याचे ग्रोव्हर म्हणाले. आपण कायमच एक प्रायव्हेट आयुष्य जगत होतो आणि जगत राहू असे ते म्हणाले. पण एक गोष्ट नक्की यापुढे कधीही गुंतवणुकदारांचा गुलाम (Slave Of Investors) बनणार नाही, माझ्या अटींवर आयुष्य जगणार असे ग्रोव्हर म्हणाले.

- मेरा एक क्लास है, इन लोगों का कोई क्लास नहीं है म्हणत अश्नीर ग्रोव्हर यांनी रजनीश कुमार, केवल हांडा, मिसी, हरजीत, राहुल किशोर, सुमीत सिंह आणि सुहैल समीर यांच्यावर निशाणा साधला. मला या अशा लोकांसोबत कामही करायचे नाही आणि त्यांच्या सहवासातही राहायचे नसल्याचे ग्रोव्हर म्हणाले. या सगळ्या लोकांबद्दल माझ्याजवळ अशा काही गोष्टी आहेत, जर मी त्या सांगितल्या, तर Sequoia भारतात कधीही गुंतवणूक करणार नाही. त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय दिसतील.

- ग्रोव्हर यांनी कंपनीला राजीनामा दिला आहे, पण त्यांच्यावर जी केस सुरु आहे त्याबद्दल विचारले असता ही एक मेड अप अर्थात मुद्दाम तयार केलेली केस आहे. यात तर ते त्यांना हवे ते करू शकतात असे ग्रोव्हर म्हणाले. त्यांच्याविरोधात आपल्याजवळही बऱ्याच केसेस असल्याचे ग्रोव्हर यांनी सांगितले. भाविक कोलदडियाने रजनीश कुमारच्या घरातून फोन करून आपल्याला धमकी दिल्याचे ग्रोव्हर यांनी सांगितले.

- आपण भाविन तुराखिया आणि नितीन कामतसारख्या लोकांचा आदर करतो, ज्यांच्याकडे १०० टक्के मालकीसह व्यवसाय सुरू करण्याचे धैर्य आहे. थोडा जास्त वेळ लागेल. पण, आता जे बनवेन त्यावर आपले संपुर्ण नियंत्रण असेल आणि संधीसाधू लोकांसाठी तर अजिबात काहीही बनवणार नाही असे ग्रोव्हर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT