नवी दिल्ली - पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने अंटल पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे. या नव्या बदलांमुळे पेन्शन योजनेचा लाभ मिळणाऱ्यांना वर्षभरात कधीही एकदा पेन्शनची रक्कम कमी किंवा जास्त करता येणार आहे. हे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारावर असू शकतं. या नियमाचा फायदा थेट जवळपास 2.28 कोटी जणांना मिळणार आहे. पीएफआरडीएने सर्व बँकांना वर्षभरात कोणत्याही वेळी पेन्शनची रक्कम कमी किंवा वाढवण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. ही नवीन सुविधा 1 जुलै 2020 पासून सुरु झाली आहे.
याआधी ही सुविधा फक्त एप्रिल महिन्यामध्ये देण्यात आली होती. पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन रकमेमध्ये बदल करता येत होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अटल पेन्शन योजनेंतर्गत सबस्क्रायबर त्यांच्या उत्पन्नानुसार पेन्शनच्या प्लॅनमध्ये कोणत्याही प्ररकारचा बदल करू शकणार आहेत. आर्थिक वर्षात फक्त एकदाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
अटल पेन्शन योजना 1 जुलै 2020 पासून ऑटो डेबिटचीही सुविधा सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे सबस्क्रायबर्सना दिलासा देण्यासाठी 11 एप्रिल 2020 ला याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार 30 जून 2020 पर्यत ऑटो डेबिट सुविधा बंद करण्यात आली होती. सध्याच्या व्यवस्थेअंतर्गत एप्रिल ते ऑगस्टदरम्यान सर्व प्रलंबित अंशदान सबस्क्रायबर्सच्या बचत खात्यादतून 30 सप्टेंबर 2020 पर्यत कापून घेतले गेले तर त्यावर कोणत्याही प्रकारची पेनल्टी भरावी लागणार नाही.
अटल पेन्शन योजना एक पेन्शन स्कीम आहे. जी कमी उत्पन्न वर्गातील लोकांसाठी 2015 मध्ये सुरु करण्यात आली होती. पीएफआरडीएकडून ही योजना चालवली जाते. या योजनेंतर्गत 18 ते 40 वर्षांपर्यंतचा कोणीही भारतीय नागरिक लाभ घेऊ शकतो. यासाठी संबंधित नागरिकाचे कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असायला हवं. या योजनेंतर्गत सबस्क्रायबर्सचे वय 60 झाल्यानंतर 1000 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. यासाठी वेगवेगळ्या वयानुसार अंशदान करावं लागतं. वयाच्या 21 व्या वर्षी 50 हजार रुपयांच्या पेन्शन योजनेसाठी महिन्याला 210 रुपये भरावे लागतील. वय जास्त असेल तर महिन्याला भरावी लागणारी रक्कमही वाढत जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.