वैयक्तिक पातळीवरील कर्जदाराची आर्थिक पत कशी आहे, यावर अवलंबून असलेले ‘इन्स्टा पर्सनल लोन’ हे कर्ज फक्त अपवादात्मक अशा आणीबाणीच्या परिस्थितीच का वापरावे, हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत ३० वय असलेल्या एका तरुणाला आपल्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी तातडीने पैशांची गरज आहे. नातेवाईक-मित्र यांच्याकडून थोडेफार पैसे गोळा करून झाल्यावरही आणखी साधारण १० लाख रुपये कमी पडत असल्यामुळे त्याने ‘इन्स्टा पर्सनल लोन’ घ्यायचे ठरविले. या रकमेची परतफेड तीन वर्षांमध्ये करावी, असा त्याचा मानस आहे आणि आपल्याला त्यावर १४ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, याची त्याला कल्पना आहे. आता यासाठी आपल्याला दरमहा किती हप्ता भरून हे कर्ज फेडावे लागेल; म्हणजेच आपला ‘इएमआय’ किती असेल, हे त्याला जाणून घ्यायचे आहे. यासाठी संबंधित बॅंक, वित्तसंस्था किंवा या क्षेत्रामधील सल्लागार कंपन्या यांच्या वेबसाइटवर बरीचशी माहिती उपलब्ध असते. तसेच या सर्व वेबसाइटवर त्यासाठीचे तयार ‘कॅल्क्युलेटर’सुद्धा उपलब्ध असतात. त्यात या तरुणाने १० लाख रुपये कर्ज, परतफेडीची ३६ महिने मुदत आणि १४ टक्के व्याज ही माहिती भरली.
ही माहिती भरल्यानंतर आपल्याला हे कर्ज फेडण्यासाठीचा मासिक हप्ता ३४,१७७.६३ रुपये असल्याचे त्याच्या लक्षात आले. असा हप्ता ३६ महिने भरायचा म्हणजे एकूण १२,३०,३९४.६७ रुपये भरावे लागणार. याचाच अर्थ या तरुणाने १० लाख रुपये कर्ज घेतल्यावर त्याला तीन वर्षांमध्ये मूळ मुद्दल फेडण्याशिवाय वर आणखी साधारण सव्वादोन लाखांच्या वर रक्कम व्याज म्हणून भरावी लागणार होती. याचा सोपा अर्थ म्हणजे फक्त व्याजापोटी तो दर महिन्याला जवळपास ६४०० रुपये भरणार. त्यातच त्याचा एखादा हप्ता जरी चुकला, तरी ही रक्कम चक्रवाढ व्याजाच्या दराने वाढत जाणार. शिवाय यात ‘प्रोसेसिंग फी’सारख्या इतर खर्चांचा विचार केलेला नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कर्ज काढून सणवार साजरा करू नये, तसेच लग्नही करू नये, असे का म्हणतात हे आपल्या आता लक्षात येईल. याच गोष्टींचा गैरफायदा उठविणारी ‘लोन शार्क’ नावाची घातक संकल्पना ‘फिनटेक’च्या दुनियेत अवतरलेली आहे. त्याविषयी पुढच्या वेळी...
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.