‘१०० बॅगर्स’ म्हणजे असे शेअर, की ज्यांचा भाव १०० पट होतो, म्हणजे रु. १०,००० गुंतवणुकीचे रु. १०,००,००० होतात!
क्रिस्टोफर मायर हे एक पोर्टफोलिओ मॅनेजर असून, या पुस्तकाद्वारे त्यांनी ‘१०० बॅगर्स’ कसे शोधावे, याचे मार्गदर्शन केले आहे. ‘१०० बॅगर्स’ म्हणजे असे शेअर, की ज्यांचा भाव १०० पट होतो, म्हणजे रु. १०,००० गुंतवणुकीचे रु. १०,००,००० होतात! हे मार्गदर्शन त्यांनी गेल्या कित्येक दशकातील ‘१०० बॅगर्स’ ठरलेल्या अनेक कंपन्यांच्या निरीक्षणावरून केले आहे. अशी कंपनी हाती लागण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळावी लागतात, ती अशी पुढीलप्रमाणे-
लार्ज कॅप कंपन्यांकडे दुर्लक्ष करा आणि छोट्या कंपन्या आपल्या रडारवर ठेवा, कारण मोठ्या कंपन्यांचे भाव १०० पट वाढणे अशक्य असते.
ज्या कंपनीमध्ये, कंपनीच्या मालकांचा मोठा हिस्सा आहे, अशीच कंपनी गुंतवणुकीसाठी निवडावी.
जी कंपनी विक्री व नफा सातत्याने वाढवत आहे, अशीच कंपनी गुंतवणुकीला आदर्श समजावी. अशा कंपनीचे ‘अर्निंग पर शेअर’ आणि ‘प्राइस अर्निंग मल्टिपल’ दोन्ही वाढून भाव वेगाने वाढतो, यालाच लेखक ‘ट्विन इंजिन’ असे म्हणतात.
असा शेअर एकदा खरेदी केला, की दोन-तीन दशके त्याच्याकडे बघूसुद्धा नये, यालाच ‘कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग’ असे म्हणतात. पूर्वीच्या काळी पाश्चिमात्य देशात मौल्यवान वस्तु कॉफी कॅनमध्ये दडवून ठेवण्याची पद्धत होती.
एकदा असा शेअर खरेदी केला, की व्याजाचे दर, महागाई, मंदी, युद्ध अशा ‘मॅक्रो’ भाकीतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा.
वरील गुंतवणूक पद्धत समजायला तर सोपी आहे, मग सर्वच जण १०० बॅगर्सचा शोध का घेत नाहीत, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नाचे उत्तर असे आहे, की त्यासाठी भरपूर ‘पेशन्स’ लागतो आणि असे होऊ शकते, यावर विश्वास असावा लागतो. शेअरचा भाव दुप्पट झाला, की आपले मुद्दल काढून घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. असे केल्यास ‘१०० बॅगर्स’ कसे हाती लागणार? आणि समजा, शेअरचा भाव १०० पट न वाढता १० पट झाला तरी कोठे बिघडले? हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.