atul sule writes about share market Settlement T+1 Esakal
अर्थविश्व

अभिमानास्पद ‘टी+१’ सेटलमेंट!

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारी २०२३ पासून भारतीय शेअर बाजारातील सर्व शेअरच्या व्यवहारांचे सेटलमेंट ‘टी+१’ तत्त्वावर होणार

अतुल सुळे

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २७ जानेवारी २०२३ पासून भारतीय शेअर बाजारातील सर्व शेअरच्या व्यवहारांचे सेटलमेंट ‘टी+१’ तत्त्वावर होणार आहे. ही निश्चितच सर्व भारतीयांना अभिमानाची गोष्ट आहे, कारण चीन वगळता जगातील कोणत्याच देशात अजून ‘टी+१’ ही सेटलमेंटची पद्धत अंमलात आलेली नाही.

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान यांसारख्या प्रगत देशांतसुद्धा अजूनही शेअर बाजारातील व्यवहारांची पूर्तता ‘टी+२’ पद्धतीने करण्यात येते. भारतीय भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’ने मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराला ‘टी+१’ ही पद्धत टप्प्याटप्प्यात लागू करण्यास सांगितले होते.

त्या सूचनेनुसार २५ फेब्रुवारी २०२२ पासून मार्केट कॅपिटलायझेशनच्या अनुक्रमानुसार सर्वांत लहान १०० कंपन्यांना सर्वप्रथम ही पद्धत लागू करण्यात आली. २५ मार्च २०२२ रोजी अजून ५०० छोट्या कंपन्यांना ‘टी+१’ पद्धत लागू झाली. त्यापुढील दर महिन्याला अजून ५०० कंपन्यांना या पद्धतीखाली आणण्यात आले. राष्ट्रीय शेअर बाजारात सुमारे १८००, तर मुंबई शेअर बाजारात ५००० पेक्षा अधिक कंपन्यांचे व्यवहार होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण व्हायला २७ जानेवारी २०२३ चा दिवस उजाडणार! या दिवसापासून वायदा बाजारात व्यवहार होणाऱ्या १९१ मोठ्या कंपन्या ‘टी+१’ सेटलमेंटखाली येणार आहेत.

‘टी+२०’ ते ‘टी+१’

आता ही ‘टी+२’, ‘टी+१’ संकल्पना काय आहे, ते समजून घेऊ. टी म्हणजे ट्रॅन्झॅक्शनचा दिवस, ज्या दिवशी तुम्ही शेअर बाजारात खरेदी अथवा विक्रीचा व्यवहार करता. +२/+१ म्हणजे या व्यवहाराच्या पूर्ततेला लागणारे दिवस. जेव्हा आपण शेअर बाजारातून शेअर खरेदी करतो,

तेव्हा खरेदीदाराच्या डी-मॅट खात्यात शेअर जमा होतात व शेअर विकणाऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण झाला, असे म्हणतात. याला तांत्रिक भाषेत ‘सेटलमेंट’ म्हणतात.

पूर्वी शेअर सर्टिफिकेट जेव्हा कागदी स्वरूपात होती, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दोन ते तीन आठवडे लागत असत. सर्टिफिकेट हरवल्यास अथवा ‘ट्रान्स्फर डीड’वरील सही न जुळल्यास अजूनच वेळ लागत असे.

आठवड्याभरात केलेल्या व्यवहारांचे सेटलमेंट एकाच दिवशी होत असे, त्याला ‘वीकली अकाउंट सेटलमेंट’ म्हणण्यात येत असे. नंतर १९९६ पासून डी-मॅट आले व टी+५ पद्धत अस्तित्वात आली. एप्रिल २००२ पासून ‘टी+३’ व एप्रिल २००३ पासून ‘टी+२’ ही पद्धत आणण्यात आली, म्हणजेच ‘सेटलमेंट’चा एक दिवस कमी करायला आपल्याला वीस वर्षे वाट पाहावी लागली!

असो, ‘देर आये दुरुस्त आये’! ‘वीकली सेटलमेंट’च्या जागी ‘रोलिंग सेटलमेंट’ (रोजच्या रोज) झाल्याने, नेट बँकिंग व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ‘सेटलमेंट’चा वेळ कमी करणे शक्य झाले. सुमारे ‘टी+२०’ पासून ते ‘टी+१’ पर्यंतचा हा प्रवास खरोखरच अद्भुत आहे.

येत्या २७ जानेवारी २०२३ पासून तुम्ही आज शेअर खरेदी केले, तर उद्या ते तुमच्या डी-मॅट खात्यात जमा होतील; तसेच आज शेअर विकले, तर उद्या त्यांचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील! या सुधारणेमुळे गुंतवणूकदारांच्या पैशाचे ‘रोटेशन’ वेगाने होईल व शेअर बाजारातील उलाढाल वाढेल, अशी अपेक्षा आहे.

शेअर व्यवहार सेटलमेंट येत्या

  • २७ जानेवारीपासून ‘टी+१’ तत्त्वावर

  • जगभरात चीननंतर फक्त भारतात ही सुविधा सुरू

  • कागदी स्वरूपात शेअरच्या काळात ‘टी+२०’ पद्धत

  • डी-मॅट आल्यानंतर ‘टी+५ ’

  • एप्रिल २००२ पासून ‘टी+३’

  • एप्रिल २००३ पासून ‘टी+२’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT