Bank Privatisation : देशभरातील अनेक सरकारी बँकांचे वेगाने खाजगीकरण करण्याचे काम केले जात आहे. बँकेच्या खाजगीकरणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. जानेवारी महिन्यात सरकार आणखी एका बँकेचे खासगीकरण करणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. सरकारने IDBI बँकेच्या (IDBI bank privatization news) खाजगीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या सरकार अनेक बँकांमधील हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. दरम्यान, आयडीबीआय बँकेचे 6 दिवसांनी खाजगीकरण करणार आहे.
सरकारने IDBI बँकेच्या खाजगीकरणासाठी प्रारंभिक बोली भरण्याची अंतिम मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. सरकार आणि LIC यांना IDBI बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विकायचा आहे.
यासाठी आयडीबीआय बँकेने ऑक्टोबरमध्ये संभाव्य खरेदीदारांकडून निविदा मागवल्या होत्या. प्रारंभिक बोली दाखल करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर होती.
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट (DIPAM) ने एका नोटीसमध्ये म्हटले आहे की, आता व्याज पत्र (EoI) सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
EOI च्या प्रती जमा करण्याची अंतिम तारीख देखील 23 डिसेंबर ते 14 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे.
कार्लाइल ग्रुप, फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्ज आणि डीसीबी बँक ही बँक खरेदी करण्यात खूप रस दाखवत आहेत. खाजगीकरणाच्या बातमी नंतर बुधवारी बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.