raghuram rajan 
अर्थविश्व

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला रघुराम राजन यांची साथ; मोदी सरकारच्या धोरणावर टीका

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पब्लिक सेक्टरमधील बँकांचे लाखो कर्मचारी 15 आणि 16 मार्च रोजी संपावर असणार आहेत. हे कर्मचारी सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा विरोध करत आहेत. संपावर गेलेल्या या कर्मचाऱ्यांना आत RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा पाठिंबा मिळाला आहे. राजन यांनी म्हटलंय की, सरकारने जर सरकारी बँका कॉर्पोरेट्सला विकल्या तर ही एक 'सर्वांत मोठी घोडचूक' असेल. सध्या देशाची अर्थव्यवस्था कोरोनाच्या हाहाकारातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पतधोरण व्यवस्थेच्या चौकटीत काही धोकादायक बदल केले गेले तर रोख बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. न्यूज एजन्सी पीटीआयला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये रघुराम राजन यांनी हे वक्तव्य केलं आहे. राजन यांनी म्हटलंय की, मला वाटतंय की इंडस्ट्रियल हाऊसेसना सरकारी बँकांना विकणं ही मोठी घोडचूक असेल. चांगल्या प्रकारच्या या बँका परदेशी बँकांना विकणेही राजकीय दृष्टिकोनातून योग्य होणार नाही. 

सरकारच्या खासगीकरणावर काय म्हणाले राजन?
रघुराम राजन यांनी म्हटलंय की 2021-22 च्या बजेटमध्ये सरकारने खासगीकरणास खूपच महत्त्व दिलं आहे. मात्र, यावर काम करण्याचा सरकारचा इतिहास चांगला राहिलेला नाहीये. राजन यांनी म्हटलंय की यावेळी हे कसं शक्य होईल हे माहिती नाही. वेळ पडली तर भारतातील एखादी खासगी बँक सरकारी बँका खरेदी करू शकेल, पण त्यांची तयारी आहे का किंवा त्यांना पेलेल का याची खात्री नाही. 

सरकारने बजेटमध्ये खासगीकरणासाठी 1.75 लाख कोटी रुपये जमवण्याचे उद्दिष्ट्य ठेवलं आहे. हे पैसे पब्लिक सेक्टरमधील कंपन्या आणि आर्थिक संस्थांमधील सरकारची भागीदारी विकून येईल. पुढील वर्षापर्यंत दोन पब्लिक सेक्टर बँका आणि एक जनरल इंश्यूरन्स कंपनीच्या खासगीकरणाची योजना आहे. या दोन बँकांच्या प्रस्ताविक खासगीकरणावर रघुराम राजन यांनी म्हटलंय की, हे कसं केलं  जाईल याबाबत फारच कमी माहिती आहे. 

खासगीकरणाविरोधात संप
15 आणि 16 मार्च रोजी बँकिंग सुविधा ठप्प असणार आहेत. कारण या दोन दिवशी बँकांचे लाखो कर्मचारी संपावर असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने आपल्या वक्तव्यात दावा केलाय की, 10 लाख कर्मचारी आणि ऑफिसर या संपामध्ये सहभागी होतील. UFBU नऊ युनियन्सची संघटना आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

Imtiaz Jaleel : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतांच्या फुटीचा जलील यांना फटका

Devendra Fadnavis : फडणवीस यांचा विजयी ‘षटकार’

SCROLL FOR NEXT