Benefits Of Fixed Deposit : गुंतवणुकीच्या बाबतीत बँक मुदत ठेवी हा नेहमीच लोकांचा पसंतीचा पर्याय राहिला आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला एफडी घ्यायची असते, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यायचं असतं की जास्त व्याज कुठून मिळवायचं?
सध्या आपल्यासमोर गुंतवणुकीच्या पर्यायांची कमतरता नाही. तरीही योग्य पर्याय निवडून गुंतवणूक करणं हे मोठं आव्हान आहे. तसं पहायला गेलं तर एफडी हे गुंतवणुकीचं नवीन साधन नाही, परंतु बाजारातील अस्थिरता लक्षात घेता तो नक्कीच एक स्मार्ट पर्याय ठरतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एफडी खाते कमी रकमेत आणि लहान वयातही उघडता येतं.
पैसे काढण्याची सोय आणि डिपॉझिट कॅपिटलची सुरक्षितताही महत्त्वाची ठरते. या दृष्टिकोनातून देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय आणि पोस्ट ऑफिस मुदत ठेवींवर आकर्षक पर्याय देत आहेत. चला जाणून घेऊया व्याजदर आणि टॅक्स बेनिफिट्ससह इतर सुविधांबद्दल.
पोस्ट ऑफिसमध्ये मुदत ठेवींवरील व्याजदर ६.८ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा फायदा होतो. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना येथे अतिरिक्त व्याजाची सुविधा मिळत नाही.
फायदेशीर व्याजदर
स्टेट बँक ऑफ इंडिया दोन कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर सामान्य गुंतवणूकदारांना ३ ते ७ टक्के व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांना ०.५ टक्के अधिक व्याज मिळते. एसबीआयच्या अमृत कलश योजनेत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.६ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. पैसे जमा केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही एफडी तोडता येणार नाही.
मुदत ठेव
'जर मुदत ठेव 1 वर्षापूर्वी पण 6 महिन्यांनंतर बंद झाली असेल तर पोस्ट ऑफिस एफडीवर बचत खात्याचा व्याज दर देते. त्याचवेळी एसबीआय अकाली एफडी तोडल्याबद्दल ग्राहकांकडून दंड वसूल करते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमधील एफडीवर प्राप्तिकर कायद्यांतर्गत ग्राहकांना समान आयकर सवलत मिळते.
टाइम डिपॉझिट
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एफडीची मुदत ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत करता येते. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी टाइम डिपॉझिट उपलब्ध आहे.
घरी बसून सुरू करता येते एफडी
ग्राहकांना आता घरी बसून आपले एफडी खाते सुरू करता येते. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे एफडी खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. अगदी काही मिनिटांत तुम्ही एफडी खातं सुरू करू शकता.
विमा आणि आरोग्यसेवांचाही मिळतो लाभ
एफडी हा सर्वांत पारंपरिक आणि विश्वासार्ह बचत पर्याय मानला जातो. सध्या अनेक बँका या पर्यायासोबत विनामूल्य जीवन विमा सुरक्षाही देतात. काही बँका ५० लाख रुपयांपर्यंतच्या एफडी रकमेसोबत विनामूल्य जीवन विमा संरक्षण देतात. तर, काही ठिकाणी आरोग्यसेवा देखील उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.