share market esakal
अर्थविश्व

Multibagger Stock: चक्क 49 हजाराच्या गुंतवणूकीचे झाले 1 कोटी, तुमच्याकडे हा शेअर आहे का?

लाँग टर्ममध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीसह कंपनीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Multibagger Stock: आयटी सर्व्हिसेजमधील एमफॅसिसचे (Mphasis) शेअर्स एका वर्षात 31 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. असं असलं तरी एमफॅसिसने लाँग टर्ममध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी गुंतवणुकीसह त्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

मंगळवारी सुमारे अडीच टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 2110.55 रुपयांवर बंद झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. घरगुती ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणुकीसाठी 2450 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. (Best Stock Mphasis share market have given best return investors)

एमफॅसिसचे शेअर्स 19 ऑक्टोबर 2001 रोजी अवघ्या 10.29 रुपये किमतीत मिळत होते. आता ते 20,411 टक्क्यांनी वाढून 2110.55 रुपयांवर गेलेत. म्हणजे त्यावेळची केवळ 49 हजार रुपयांची गुंतवणूक आता 205 पटीने वाढून एक कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

मागील वर्षी 31 मार्च 2022 रोजी त्याची किंमत 3466.40 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. त्यानंतर, 19 डिसेंबर 2022 पर्यंत, तो 45 टक्क्यांनी घसरून 1897.35 रुपयांवर आला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी निचांक आहे.

एमफॅसिस ऍप सर्व्हिसेज, बीपीओ आणि इन्फ्रा सर्व्हिसेज, बीएफएसआय, टेक, कम्युनिकेशन आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेज देते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मध्ये स्थिर चलन अटींमध्ये तिमाही आधारावर त्याचा थेट रेव्हेन्यू 2.7 टक्क्यांनी आणि रेव्हेन्यू 2.5 टक्क्यांनी घसरला.

मजबूत नेट न्यू डील बुकिंग्स, डील पाइपलाइनवरील सकारात्मक ट्रेंड, बीएफएसआय आणि मॉर्गेज व्यवसायासाठी मजबूत दृष्टीकोन यामुळे व्यवसायावर आता कमी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने यामध्ये 2450 रुपयांचे टारगेट गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT