Share Market Latest Updates | Stock Market News Sakal
अर्थविश्व

'हे' दोन शेअर्स करतील तुम्हाला मालामाल, तज्ज्ञांना विश्वास...

शेअर मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी गुंतवलेले पैसे तुम्हाला तगडा परतावा मिळवून देतात.

शिल्पा गुजर

Best Stock to Buy: शेअर मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी गुंतवलेले पैसे तुम्हाला तगडा परतावा मिळवून देतात हे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. लाँग टर्मसोबतच शेअर्सही तितकेच दर्जेदार असणे गरजेचे आहे. अशात आम्ही तुमच्यापर्यंत दरदिवशी तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही शेअर्सचे देत असतो. आजही शेअर मार्केटमधील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील शेअर्सबद्दल सांगणार आहोत. तर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनी (Indian Hotels Company) औरआणि टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications) यांचा समावेश आहे. या दोन्ही शेअर्सने गेल्या दोन वर्षात मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी (Indian Hotels Company)-

इंडियन हॉटेल्स कंपनीने मार्च तिमाहीत 97.72 कोटी नफा नोंदवला आहे, मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत त्यांना 71.57 कोटीचा तोटा झाला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 872.08 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 615.02 कोटी होता.

ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्स कंपनीवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे आणि त्याचे टारगेट 285 वरून 292 रुपयांपर्यंत वाढवले आहे. इंडियन हॉटेल्सचा लाँग टर्म आउटलूक बुलिश अर्थात तेजीचा आहे आणि हॉटेल उद्योगातील रिकव्हरीचा या स्टॉकचा फायदा होईल. पण येत्या काही दिवसांत कोविडची कोणतीही नवीन लाट आली तर ती हॉटेलसाठी धोक्याची ठरू शकते असेही तज्ज्ञ सांगत आहेत.

राकेश झुनझुनवाला यांच्याजवळ कंपनीत एकूण 30,016,965 शेअर्स अर्थात 2.1 टक्के हिस्सेदारी होते ( 31 मार्चपर्यंत). झुनझुनवाला यांनी जून 2009 मध्ये हा स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केला होता.

टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications)-

टाटा कम्युनिकेशन्सने गेल्या सलग आठ तिमाहीत चांगला नफा कमावला आहे. कंपनीचा नफा वार्षिक 18.5 टक्क्यांनी वाढून FY22 मध्ये 1,482 कोटी झाला. तर त्याचे उत्पन्न जवळपास चार पटीने वाढून 16,725 कोटी रुपये झाले.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने टाटा कम्युनिकेशन्सवर 1,600 च्या टारगेटसह बाय रेटींग (Buy Rating) दिले आहे. डेटा व्यवसायातून कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 5 टक्के आणि तिमाही दर तिमाहीत 0.7 टक्क्यांनी वाढला आहे. तिसऱ्या तिमाहीच्या ऑर्डर बुकपेक्षा हे कमकुवत आहे, पण सुधारणेला वाव आहे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टाटा कम्युनिकेशन्समध्ये 1.1 टक्के हिस्सा अर्थात 3,075,687 शेअर्स आहेत. झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2020 मध्ये ही कंपनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केली.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

Stock Market: शेअर बाजारात तेजी कधी येणार? मोतीलाल ओसवालने सांगितले बाजाराचे भविष्य

Big Updates: विराट कोहली, लोकेश राहुल दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकणार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

कधी स्पॉटबॉयचं काम तर कधी अभिनेत्रींचे कपडे इस्त्री केले ; बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीचा डोळ्यात पाणी आणणारा स्ट्रगल

SCROLL FOR NEXT