Share Market Sakal
अर्थविश्व

नकारात्मक कल, सावधगिरी आवश्यक!

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,३४४ अंशांवर, तसेच ‘निफ्टी’ १५,६८३ अंशांवर बंद झाला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आगामी काळात महागाई आणि व्याजदराबाबत वक्तव्य केल्याने गेल्या आठवड्यात अमेरिकी शेअर बाजाराने घसरण नोंदविली. जागतिक बाजारातील पडझडीमुळे ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’मध्ये देखील घसरण झाली. गेल्या शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने ५३३ अंशांची घसरण नोंदविल्याने नव्या आठवड्याच्या प्रारंभी नकारात्मक संकेत मिळत आहेत.

रेटिंग कंपन्यांकडे लक्ष

गेल्या आठवड्यात ‘क्रिसिल’ तसेच ‘केअर’ या ‘रेटिंग’ करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने तेजी दर्शविली. ‘क्रिसिल’ ही कंपनी पतमानांकन, संशोधन, जोखीम आणि धोरण सल्लासेवा प्रदान करते. ‘क्रिसिल’ ही भारताची अग्रगण्य रेटिंग एजन्सी आहे. मागील पाच वर्षे रु. २५०० ते १००० या पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. २५६४ ला बंद भाव देऊन आलेखानुसार, ‘क्रिसिल’च्या शेअरने मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. जोपर्यंत या कंपनीच्या शेअरचा भाव बंद भाव तत्त्वावर रु. १७४० या आधार पातळीच्या वर आहे तोपर्यंत चढ-उतार करीत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ दिसू शकते.

फर्टिलायझर कंपन्यांत तेजीचा कल

कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबळ फर्टिलायझर या कंपन्यांच्या शेअरने गेल्या आठवड्यात तेजीचा कल दर्शविला आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल ही कंपनी खते, कीटकनाशके आणि विशिष्ट पोषक द्रव्यांचा व्यवसाय करते. जुलै २०२० पासून मर्यादित पट्यातच चढ-उतार केल्यावर बंद भाव तत्त्वावर रु. ८७७ ला बंद भाव देऊन या कंपनीच्या शेअरने तेजीचा कल दर्शविला. आलेखानुसार जोपर्यंत भाव रु. ६८१ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीत आणखी भाववाढ होऊ शकते.

आगामी आठवड्यात आलेखानुसार तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरने तेजीची वाटचाल केल्यास, मर्यादित भांडवलावर मर्यादितच धोका स्वीकारून आवश्यकतेनुसार आधार पातळीचा ‘स्टॉपलॉस’ ठेवून मध्यम अवधीसाठी ‘ट्रेडिंग’ करणे योग्य ठरू शकेल. सद्यःस्थितीमध्ये निर्देशांक; तसेच जागतिक बाजारपेठेत नकारात्मक कल असल्याने शॉर्ट टर्म, तसेच मीडियम टर्म ‘ट्रेडिंग’ करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

मंदीत दीर्घावधीसाठी संधी

गुंतवणूक गुरू वॉरेन बफे म्हणतात, ‘व्यवसायात उत्तम परतावा मिळवून प्रगती करणाऱ्या कंपन्यांसाठी काळ हा मित्र असतो. मात्र, भांडवलावर अल्प प्रमाणात परतावा मिळविणाऱ्या किंवा नुकसान करत राहणाऱ्या व्यवसायासाठी काळ हा शत्रू असतो. आगामी काळात निर्देशांकाने मंदी दर्शविल्यास अशा मंदीमध्ये व्यवसायात भांडवलावर उत्तम परतावा मिळवत कर्जाचे प्रमाण कमी ठेऊन प्रगती करत असलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये दीर्घावधीसाठी गुंतवणुकीची उत्तम संधी मिळू शकेल. अनेक वर्षे व्यवसायात उत्तम परतावा मिळवत असलेल्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर, मॅरिको; तसेच डॉक्टर लाल पॅथ लॅब, कॅम्स आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये व गोल्ड बीज अर्थात सोन्यात दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचे धोरण स्वीकारणे फायदेशीर ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे, त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT