Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर मार्केट : लक्ष्मण रेषा : ‘कट युअर लॉसेस शॉर्ट’

डेल्टा विषाणूचा वाढता फैलाव; तसेच आगामी काळात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह रोखेखरेदीचा कार्यक्रम थांबविण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारात घसरण झाली.

भूषण गोडबोले

डेल्टा विषाणूचा वाढता फैलाव; तसेच आगामी काळात अमेरिकी फेडरल रिझर्व्ह रोखेखरेदीचा कार्यक्रम थांबविण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारात घसरण झाली. त्याचा परिणाम आपल्याही बाजारावर झाला आणि शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने ३००अंशांची, तर ‘निफ्टी’ने ११८ अंशांची घसरण नोंदविली. गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिकी शेअर बाजाराने तेजी दर्शविल्याने येत्या आठवड्याच्या सुरवातीस भारतीय शेअर बाजार देखील ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी मारू शकतो.

गेल्या दोन आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. विशेषतः मिड कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मध्यम अवधीसाठी; तसेच अल्पावधीसाठी ‘ट्रेडिंग’ करताना आलेखानुसार तेजीचा कल दर्शविणाऱ्या शेअरची निवड करणे योग्य ठरते. कंपनी ‘फंडामेंटल्स’नुसार सक्षमता दर्शवत असेल, तरीदेखील सर्वच व्यवहार फायदेशीर ठरत नाहीत. यामुळे असे म्हणतात, की ‘मार्केट का ऐसा कोई सगा नहीं जिसको मार्केटने ठगा नहीं!’ यशस्वी ट्रेडरचे देखील अनेक व्यवहार चुकतात. मात्र, ते मार्केटमध्ये यशस्वी होतात; कारण चुकीच्या ठरणाऱ्या व्यवहारात ते लक्ष्मण रेषा किंवा ‘स्टॉपलॉस’ ठरवून योग्य वेळेत तोटा स्वीकारून बाहेर पडतात. यामुळे नंतर आणखी पडझड वाढल्यास तोटा मर्यादितच राहतो. अशा प्रकारे ‘ट्रेडिंग’ करताना तोटा नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘कट युअर लॉसेस शॉर्ट’ हा नियम उपयोगी पडतो.

लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

‘एफएमसीजी’ क्षेत्रात तेजीचे संकेत

  • गेल्यास आठवड्यात एकीकडे ‘सेन्सेक्स’; तसेच ‘निफ्टी’त घसरण होत असताना फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) म्हणजेच नित्योपयोगी वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या क्षेत्रातील ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, नेस्ले इंडिया, डाबर, मॅरिको आदी अनेक कंपन्यांच्या शेअरनी तेजीची चाल दर्शविली आहे.

  • ब्रिटानिया इंडस्टीज ही प्रामुख्याने बिस्किट उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी आहे. मागील १० वर्षांत कंपनीच्या वार्षिक विक्रीत सरासरी १० टक्के वाढ झाली आहे. तसेच कंपनीचा नफा देखील वार्षिक सरासरी १५ टक्क्यांपेक्षा जास्त गतीने वाढला आहे. आलेखानुसार, या शेअरने शुक्रवारी तेजीचा कल दर्शविला आहे. आगामी काळात रु. ४०१० या पातळीच्या वर बंद भाव दिल्यास मध्यम अवधीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात तेजीचे संकेत मिळतील.

  • हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीच्या व्यवसायात मुख्यतः होम केअर, ब्युटी, पर्सनल केअर, फूड्स आणि रिफ्रेशमेंट सेगमेंटचा समावेश आहे. मध्यम अवधीच्या आलेखानुसार, एप्रिल २०२० पासून रु. २६१४ ते रु. १९०२ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. २६१४ या पातळीच्या वर रु. २६१९ ला बंद भाव देऊन या शेअरने तेजीचा कल दर्शविला आहे.

  • गोदरेज हेअर कलर, गुड नाईट, हिट आदी अनेक प्रसिद्ध उत्पादनांची निर्मिती आणि वितरण करणाऱ्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरने देखील दीर्घावधीच्या आलेखानुसार गेल्या आठवड्यात रु. ९७८ या पातळीच्या वर रु. १०३३ ला बंद भाव देऊन तेजीचे संकेत दिले आहेत.

यामुळे वर उल्लेख केलेल्या शेअरकडे लक्ष ठेवून तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT