Share market file photo
अर्थविश्व

शेअर मार्केट : संयमाने करा व्यवहार

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,१०० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,६७० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी ‘निफ्टी’ने १५,७३३ अंशांचा नवा उच्चांक नोंदविला.

भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,१०० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,६७० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी ‘निफ्टी’ने १५,७३३ अंशांचा नवा उच्चांक नोंदविला.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५२,१०० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १५,६७० अंशांवर बंद झाला. शुक्रवारी ‘निफ्टी’ने १५,७३३ अंशांचा नवा उच्चांक नोंदविला. मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने वाढती महागाई आणि घसरणाऱ्या विकास दराकडे लक्ष ठेवून सावध पवित्रा घेत, मंदावलेल्या विकास दराला गती देण्यासाठी व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला १५,००० कोटी रुपयांचा निधी किफायतशीर दराने कर्जाने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे ईआयएच असोसिएटेड हॉटेल, ताज जीव्हीके हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स आदी आदरातिथ्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरनी तेजी दर्शविली. (Bhushan Godbole Writes about Share Market)

कच्च्या तेलाकडे लक्ष

क्रूड ऑइल अर्थात कच्या तेलाचे भाव वाढत असल्याने पेट्रोलच्या दराने भारतात प्रतिलिटर आता शंभरी देखील गाठली आहे. कच्या तेलाच्या दराच्या आलेखानुसार विचार केल्यास, आठ मार्च २०२१ पासून साधारण दोन महिने रु. ४९६७ ते ४२०१ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ४९६७ पातळीच्या वर रु. ५०७१ ला बंद भाव देऊन तेजीचा कल दर्शविला आहे. कच्या तेलाचा भाव जोपर्यंत रु. ४२०० या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याचे लक्षात येत आहे. यामुळे आगामी काळात या क्षेत्राशी निगडित कंपन्यांच्या शेअरमध्ये हालचाल होणे स्वाभाविक आहे.

‘गुजरात गॅस’मध्ये तेजीचा कल

‘गुजरात गॅस’ ही कंपनी नैसर्गिक वायू व्यवसायाच्या क्षेत्रात गुंतलेली आहे. या कंपनीच्या शेअरने आलेखानुसार, मागील दोन महिने रु. ५८० ते ४९५ या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. ५८९ ला बंद भाव देऊन त्याने तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे जोपर्यंत भाव रु. ४९४ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये तो आणखी वाढू शकतो. मात्र, शेअरच्या भावामधील चंचलता लक्षात घेता, प्रत्यक्ष व्यवहार करताना मर्यादित भांडवलावर मर्यादितच धोका स्वीकारणे योग्य ठरू शकेल.

‘मुथूट फायनान्स’च्या नफ्यात वाढ

गेल्या आठवड्यात मुथूट फायनान्स या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. कंपनीचा संपूर्ण वर्षात निव्वळ नफा २३ टक्क्यांनी वाढून ३७२२ कोटी रुपये झाला आहे, जो त्याआधीच्या आर्थिक वर्षात ३०१८ कोटी रुपये होता. आलेखानुसार, जुलै २०२० पासून तब्बल ९ महिने रु. १४०५ ते १००० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार केल्यावर गेल्या आठवड्यात रु. १५०९ ला बंद भाव देऊन त्याने मध्यम अवधीसाठी तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे रु. ९९९ या आधार पातळीच्या वर भाव आहे, तोपर्यंत मध्यम अवधीमध्ये आणखी भाववाढ होऊ शकते.

शेअर बाजार तेजीचे नवीन शिखर गाठत असताना बाजारात भावनाप्रधान होऊन आणि हुरळून जाऊन कोणत्याही कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठा धोका स्वीकारत तेजीचे व्यवहार करण्यापेक्षा ‘सोच कर समझ कर’ आणि संयमाने मर्यादितच धोका स्वीकारून ‘ट्रेड’ करणे हितावह ठरू शकेल.

वरील लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. त्यामुळे व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT