Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर मार्केट : ‘ब्लॅक फ्रायडे’तून संधीचा शोध!

आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने एकाच दिवसात ८८९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने २६३ अंशांची घसरण करून ‘ब्लॅक फ्रायडे’ची नोंद केली.

भूषण गोडबोले

आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने एकाच दिवसात ८८९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने २६३ अंशांची घसरण करून ‘ब्लॅक फ्रायडे’ची नोंद केली.

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,०११ अंशांवर, तसेच ‘निफ्टी’ १६,९८५ अंशांवर बंद झाला. जागतिक पातळीवर विविध मध्यवर्ती बँकांनी आगामी काळात पतधोरणाबाबत कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिल्याने; तसेच नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे गेल्या शुक्रवारी ‘सेन्सेक्स’ने एकाच दिवसात ८८९ अंशांची, तर ‘निफ्टी’ने २६३ अंशांची घसरण करून ‘ब्लॅक फ्रायडे’ची नोंद केली. अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने देखील ५३२ अंशांची घसरण दर्शविली. यामुळे या आठवड्याच्या सुरवातीस आंतरराष्ट्रीय बाजारातून नकारात्मक म्हणजेच मंदीचे संकेत मिळू शकतात. आलेखानुसार आगामी कालावधीसाठी ‘सेन्सेक्स’ची ५६,३८२; तसेच ‘निफ्टी’ची १६,७८२ ही महत्त्वाची आधार पातळी आहे.

‘ब्लॅक फ्रायडे’नंतर आता आगामी काळात ‘ब्लॅक मंडे’, ‘ब्लॅक ट्यूसडे’, ‘ब्लॅक वेन्सडे’ अशी नोंद करत बाजाराने मोठी घसरण केली, तर ट्रेडर तसेच गुंतवणूकदारांनी काय करावे?

‘ट्रेडर’नी सध्या काय करावे?

सध्या बाजाराचा कल नकारात्मक असल्याने जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत ट्रेडरनी अल्पावधीसाठी; तसेच मध्यम अवधीसाठी तेजीचे व्यवहार न करता योग्य संधीची वाट पाहणे योग्य ठरेल. तसेच मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार यापूर्वी अल्पावधीसाठी आणि मध्यम अवधीसाठी ट्रेडिंगच्या दृष्टीने खरेदी केलेल्या शेअरसाठी आलेखानुसार ‘स्टॉपलॉस’ ठेवणे आवश्यक आहे, कारण ‘बचेंगे तो और लढेंगे!

दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना...

दीर्घावधीसाठी गुंतवणूक करत असताना मात्र बाजारातील मंदी म्हणजे उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधीच मिळत असते. उत्तम परतावा मिळवत असलेल्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये आगामी काळातील व्यवसायवृद्धी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण ठेवल्यास ‘ब्लॅक मंडे’ असो की ‘ब्लॅक फ्रायडे’, बाजारातील मंदीत संधी घेणे शक्य होते.

कोणत्या शेअरचा विचार कराल?

1) कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस (कॅम्स) (भाव - रु. २६४७)

प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी कार्यरत असणारी ट्रान्स्फर एजन्सी म्हणून कामकाज करणारी ही अग्रेसर कंपनी आहे. दीर्घावधीमध्ये भारतात ॲसेट मॅनेजमेंट म्हणजेच मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. कंपनीने आजपर्यंत गुंतविलेल्या भांडवलावर उत्तम परतावा मिळविला आहे. बाजारात पडझड होत असताना या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

2) एसबीआय कार्डस आणि पेमेंट सर्व्हिसेस (भाव - रु. ९०४)

ग्राहकांना क्रेडिट कार्ड वितरित करण्याच्या व्यवसायात ही कंपनी कार्यरत आहे. डिजिटल पेमेंटचा वाढता वापर, वाढता ग्राहकवर्ग आणि विविध प्रकारच्या सुलभ ‘ईएमआय’च्या स्वरूपात परतफेडीचा पर्याय आदी ग्राहककेंद्रित बाबींचा विचार करता या व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊ शकते. बाजारात घसरण होत असताना या कंपनीच्या शेअरमध्येही गुंतवणूक करण्याचा जरूर विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT