Share Market Sakal
अर्थविश्व

शेअर मार्केट : कर न चुकवता श्रीमंत व्हायचंय?

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता असतानादेखील गेल्या आठवड्यात ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ ५५,५५० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,६३० अंशांवर बंद झाले.

भूषण गोडबोले

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता असतानादेखील गेल्या आठवड्यात ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ ५५,५५० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,६३० अंशांवर बंद झाले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता असतानादेखील गेल्या आठवड्यात ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच पडझडीनंतरची उसळी घेत ‘सेन्सेक्स’ ५५,५५० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १६,६३० अंशांवर बंद झाले. अमेरिकेत महागाई दराने गेल्या ४० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर जाहीर होणार आहेत. यापूर्वी गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजाराचा निर्देशांक ‘डाऊ जोन्स’ने २२९ अंशांची घसरण दर्शवून ३२,९४४ अंशांवर बंद भाव दिला आहे. सध्या संमिश्र संकेत मिळत असताना ट्रेडर्सनी, तसेच दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे व्यवहार करावेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आगामी १५ वर्षे शेअर बाजारात व्यवहार करून सरासरी वार्षिक तत्वावर साधारण १५ टक्के परतावा मिळविणे अपेक्षित धरल्यास, सातत्याने अल्पकालीन व्यवहार करणे जास्त हिताचे ठरेल, की संयम ठेऊन दीर्घावधीसाठी केलेली गुंतवणूक? शेअरच्या खरेदी-विक्रीवरील कर दोन प्रकारचे आहेत. एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच एका वर्षाच्याआत शेअरची खरेदी-विक्री करून होणाऱ्या नफ्यावर लागणारा कर, जो १५ टक्के आहे. दुसरा आहे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स (दीर्घकालीन भांडवली लाभ कर) म्हणजेच एका आर्थिक वर्षात एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवून केलेल्या शेअरच्या विक्रीवरील नफा. एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवून केलेल्या शेअरच्या विक्रीवरील नफा एक लाखाहून अधिक असेल तर एक लाखापेक्षा जास्त होणाऱ्या लाभावर १० टक्के दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागू आहे. एका व्यक्तीसाठी रु. एक लाखपर्यंतचा दीर्घकालीन भांडवली लाभ करमुक्त आहे.

समजा, एका वर्षात विविध शेअरमध्ये अल्पकालीन व्यवहार करून एकूण भांडवलावर १५ टक्के परतावा मिळविला आणि मिळालेल्या परताव्यावर १५ टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरला तर कर भरून भांडवलावर १२.७५ टक्के परतावा मिळेल. अशा प्रकारे करपात्र रु. एक लाख भांडवलावर १५ वर्षे अल्पकालीन व्यवहार करून करपश्चात सरासरी दरवर्षी १२.७५ टक्के परतावा मिळविल्यास, १५ वर्षांत भांडवलवृद्धी होऊन जवळपास रु. ६ लाख ४९९० होतात. मात्र, दीर्घावधीमध्ये होणारी व्यवसायवृद्धी लक्षात घेऊन भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसाय करणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये सतत खरेदी-विक्री न करता दीर्घावधीसाठी रु. एक लाखाची गुंतवणूक करून १५ वर्षांत दरवर्षी सरासरी १५ टक्के परतावा मिळाल्यास, भांडवलवृद्धी होऊन जवळपास रु. ८ लाख १३,७०६ होतात. दीर्घावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर मुबलक परतावा मिळाल्यावर नफा घेऊन लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरूनदेखील हा कर सातत्याने अल्पकालीन फायद्यावर भराव्या लागणाऱ्या करापेक्षा कमी असल्याने अशा दीर्घावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळत असल्याचे लक्षात येते.

अशा प्रकारे दीर्घावधीसाठी गुंतवणूक करून कर न चुकवता देखील श्रीमंत होण्याचा मार्ग दिग्गज गुंतवणूक गुरु वॉरन बफे आणि चार्ली मुंगर यांनी यापूर्वीच सांगितलेला आहे. अल्पावधीसाठी सतत व्यवहार करताना योग्य ‘मार्केट टायमिंग’सह अत्यंत सक्रियतेने व्यवहार करणे जिकीरीचे ठरते; तसेच जास्त कर भरून सतत केलेल्या व्यवहारांमुळे ब्रोकरेज देखील जास्त द्यावे लागू शकते. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जास्त प्रमाणात अल्पकालीन व्यवहार करण्याऐवजी कंपन्यांच्या उपलब्ध मालमत्तेचा; तसेच दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेऊन भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसाय करणाऱ्या; तसेच योग्य भावात मिळणाऱ्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास प्राधान्य देणे फायदेशीर ठरू शकेल.

सध्या दीर्घावधीच्या दृष्टीने पोर्टफोलिओचा विचार करता, एल अँड टी इन्फोटेक (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ६२२४), तसेच मागील लेखांमध्ये नमूद केल्यानुसार, टीटीके प्रेस्टिज (शुक्रवारचा बंद भाव ः रु. ८३९), डिव्हीज लॅब (शुक्रवारचा बंद भाव - रु. ४३३९), कॅम्स (शुक्रवारचा बंद भाव ः रु. २४९४) आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

‘सिप्ला’मध्ये तेजीचा कल (शुक्रवारचा बंद भाव - रु. १०४३)

सिप्ला ही १५०० हून अधिक उत्पादने असलेली फार्मा कंपनी आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर १७० पेक्षा जास्त देशांमध्ये ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांचा पुरवठा करते. या कंपनीचा जवळपास ४० टक्के महसूल भारतीय ब्रँडेड फॉर्म्युलेशन व्यवसायातून होत आहे. २१ टक्के अमेरिकेमधून, १२ टक्के दक्षिण आफ्रिकेमधून आणि ५ टक्के युरोपमधून कंपनी महसूल मिळवित आहे. जुलै २०२१ पासून रु. १००५ ते रु. ८५० या मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविल्यानंतर गेल्या आठवड्यात रु. १०४३ ला बंद भाव देऊन मध्यम अवधीच्या आलेखानुसार या कंपनीच्या शेअरने तेजीचा कल दर्शविला आहे. आलेखानुसार, जोपर्यंत हा भाव रु. ८४९ या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत या शेअरमध्ये मध्यम अवधीत चढ-उतार होऊन आणखी भाव वाढ होऊ शकते. आगामी काळात निर्देशांकाने, तसेच ‘सिप्ला’च्या शेअरने तेजीचे संकेत दिल्यास मर्यादित भांडवलावर मर्यादित धोका स्वीकारून मध्यम अवधीसाठी ट्रेडिंगच्या दृष्टीने तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT