new-investment 
अर्थविश्व

नवीन वर्षात "लॉंग टर्म' किंवा "शॉर्ट टर्म'? 

भूषण महाजन

गुंतवणूक करताना आणि केल्यांनतर संयम ठेवा, असे गुंतवणूक तज्ज्ञ नेहमी सांगतात. मात्र, गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक करताना आणि झाल्यानंतर  संयम राहताना दिसत नाही. गुंतवणूक कोणत्याही प्रकारची असो त्यावर चांगला परतावा (रिटर्न) मिळणे गरजेचे आहे. शेअर बाजारातदेखील सतत होणाऱ्या चढ-उतारांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका; पण नेमके तेच होते. बाजारातील "स्क्रीन'ने वेड लावले आहे. प्रत्येकाला आजच श्रीमंत व्हायचे आहे.

आजच्या युगाच्या परिभाषाही बदलल्या आहेत. पूर्वी दीर्घकाळची गुंतवणूक किमान पाच ते सहा वर्षांसाठी असायची. कधीकधी आयुष्यभरासाठी असायची आणि अल्पकालीन गुंतवणूक एक ते दोन वर्षांसाठी असायची. आजकाल अल्पकालीन गुंतवणूक जेमतेम एक ते दोन दिवस टिकते. त्याला एक गोंडस नावही दिले आहे : "बाय टुडे सेल टुमारो' (बीटीएसटी) म्हणजेच आज घ्या उद्या विका ! मात्र एका रात्रीत किती पैसे मिळणार? आणि कर- ब्रोकरेजबाबत काय ? मग सगळा खेळ "फ्युचर आणि ऑप्शन'कडे (एफअँडओ) वळला. नवा गुंतवणूकदार शोधून काढणे आणि त्याला "एफअँडओ'चा नाद लावणे, हा एक खेळ सुरू झाला. कधी पैसे मिळतात तर कधी जातात. जोपर्यंत होणारा तोटा "मार्जिन मनी'मधून कापला जातो, तोपर्यंत भांडवल शिल्लक राहते. कधी कधी रात्रीत "स्टॉप लॉस' होऊन जातो. मग "धरलं तर चावतं अन्‌ सोडलं तर पळतं' अशी अवस्था होते. मग असा मार खाल्लेला गुंतवणूकदार शेअर बाजारातून निघून जातो. 

"लॉंग टर्म' किंवा "शॉर्ट टर्म'? असा प्रश्न स्वतःला विचारण्याबरोबरच आपण केलेल्या गुंतवणुकीवर किती परतावा अपेक्षित आहे? हा प्रश्नदेखील विचारायला हवा. तसेच पूर्वी गुंतवणुकीवर मिळालेले रिटर्न बघून गुंतवणूक करायला आलेला गुंतवणूकदार सहसा यशस्वी होतोच असे नाही. 


तक्‍त्यामध्ये निर्देशांकाने दिलेले "रिटर्न' 
वर्ष 2014 मध्ये "मिडकॅप'ने 54 टक्के "रिटर्न' दिला. मात्र, त्या पुढील दोन वर्षांत फक्त 7.5 टक्के "रिटर्न' मिळाला. पुन्हा 2017 "मिडकॅप'ने चांगला परफॉर्मन्स देत कमाल केली. त्यावर्षी 48 टक्के "रिटर्न' मिळाला. ज्या गुंतवणूकदाराने वर्ष 2014 मध्ये गुंतवणूक केली, त्याने वर्ष 2017 मध्ये 48 टक्के "रिटर्न' मिळाल्यावर नफा प्रथम ताब्यात घेतला पाहिजे. 

गुंतवणूकदाराने पैसे गुंतवताना "रिटर्न' निश्‍चित करायला पाहिजे. "लॉंग टर्म' थांबलो तर "रिटर्न' वाढेल, ही अपेक्षाच चुकीची आहे. तेव्हा "रिटर्न'चे गणित लक्षात घेऊन "लॉंग टर्म' किंवा "शॉर्ट टर्म'चे उत्तर निश्‍चित केले पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT