Halwa Ceremony: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. आज अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत हलवा समारंभ होणार आहे. हा समारंभ अर्थसंकल्प दस्तऐवजाच्या अंतिम स्वरूपाच्या आधी आयोजित केला जातो.
अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले आहे की, 'हलवा समारंभ हा 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तयारी प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे. अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन नॉर्थ ब्लॉकमध्ये बजेट प्रिंटिंगसाठी प्रेसमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
2021-22 मध्ये प्रथमच डिजिटल अर्थसंकल्प सादर :
यावेळी प्रजासत्ताक दिनी हलवा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांप्रमाणे 2023-24 चा अर्थसंकल्प देखील डिजिटल स्वरूपात दिला जाईल.
पूर्वी अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम या सोहळ्यापासून सुरू व्हायचे. कोविड-19 महामारीमुळे 2021-22 मधील अर्थसंकल्प डिजिटल स्वरूपात होता. स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ होती जेव्हा अर्थसंकल्पाला कागदी दस्तऐवजाचे स्वरूप दिले गेले नाही आणि ते छापले गेले नाही.
मोबाईल अॅपवर बजेट उपलब्ध होईल :
अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर अर्थसंकल्प दस्तऐवज मोबाइल अॅप'वर उपलब्ध होईल.
हे अॅप Android आणि Apple OS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मंत्रालयाने ट्विटरवर लिहिले आहे की, 'केंद्रीय अर्थमंत्र्यांसह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, मंत्रालयाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभात उपस्थित राहणार आहेत.'
हेही वाचा : Sarfaraz Khan : धावांचा डोंगर, पण टीम इंडियातील स्थान फिटनेस अभावी गमावलं?
परंपरेनुसार, हलवा समारंभाच्या वेळी वित्त मंत्रालयात हलवा बनवला जातो. हा हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना वाटला जाते. तोंड गोड केल्यानंतर सर्व कर्मचारी बजेटच्या कामाला लागतात.
2022 मध्ये कोविडमुळे हा विधी पार पडला नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, मुख्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी 'लॉक-इन'मधून जात असल्यामुळे हलव्याऐवजी मिठाई देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.