Budget 2023 Sakal
अर्थविश्व

Budget 2023 : जाणून घ्या, अर्थसंकल्पाशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक घटना

इतिहासात अर्थसंकल्पात नेमके कोणते बदल झाले आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

राहुल शेळके

Union Budget 2023 : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांवर विशेष लक्ष? बजेटमध्ये किती शब्द असतील? बजेट किती काळ असेल? त्यात कोणते मोठे बदल होणार आहेत. असे अजून बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील.

या सर्व प्रश्नांची उत्तरे 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मिळतीलच, पण इतिहासात अर्थसंकल्पात नेमके कोणते बदल झाले आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

भारताचा पहिला अर्थसंकल्प :

भारतात प्रथमच 7 एप्रिल 1860 रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित नेते जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प ब्रिटिश राणीला सादर केला.

सर्वात लांब बजेट भाषण :

हा विक्रम फक्त सीतारामन यांच्या नावावर आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी 2 तास 42 मिनिटांचे भाषण केले. या दरम्यान त्यांनी जुलै 2019 मध्ये केलेल्या 2 तास 17 मिनिटांच्या भाषणाचा स्वतःचा विक्रम मोडला.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

अर्थसंकल्पीय भाषणातील सर्वाधिक शब्द :

मनमोहन सिंग यांच्या 1991 च्या अर्थसंकल्पीय भाषणात एकूण 18,650 शब्द होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अरुण जेटली आहेत ज्यांचे 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 18,604 शब्द होते.

सर्वात लहान बजेट भाषण :

तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांनी 1977 मध्ये केवळ 800 शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण दिले होते.

सर्वाधिक भाषण कोणी दिले :

हा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1962-69 दरम्यान अर्थमंत्री असताना सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्यापाठोपाठ पी चिदंबरम (नऊ), प्रणव मुखर्जी (आठ), यशवंत सिन्हा (आठ) आणि मनमोहन सिंग (सहा) यांचा क्रमांक लागतो.

अर्थसंकल्पीय भाषणाच्या वेळेत बदल :

1999 पर्यंत, अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता सादर केले जात होते. पण यशवंत सिन्हा यांनी 1999 मध्ये ते बदलून सकाळी 11 केले.

अरुण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2017 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण सादर केले. त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच अर्थसंकल्प सादर केला जातो.

भाषा सुधारणा :

सन 1955 पर्यंत अर्थसंकल्प फक्त इंग्रजीतच मांडला जात होता, पण काँग्रेस सरकारने तो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत सादर करण्यास सुरुवात केली. कोविड-19 महामारीच्या आगमनानंतर 2021-22 चा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात आला.

2019 मध्ये अर्थसंकल्प सादर करताना असे करणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या आधी इंदिरा गांधी यांनी 1970 मध्ये अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता.

रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश सर्वसाधारण अर्थसंकल्पात करण्यात आला :

सन 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. पण 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला आणि आता फक्त एकच अर्थसंकल्प सादर केला जातो.

बजेट प्रिंटिंगच्या जागी बदल :

1950 पर्यंत अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनात होत होती, परंतु ती लीक झाल्यानंतर, मिंटो रोड, नवी दिल्ली येथील प्रेसमध्ये छपाई केली जात होती. त्यानंतर 1980 पासून ते अर्थ मंत्रालयाच्या सरकारी प्रेसमध्ये छापले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT