Burger-King 
अर्थविश्व

‘बर्गर किंग’चा आयपीओ

नंदिनी वैद्य

सध्या शेअर बाजारात तेजीचे वारे सुसाट सुटले असताना त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक कंपन्या प्राथमिक बाजारात ‘आयपीओ’ आणत आहेत. याच लाटेचा फायदा घेण्यासाठी बर्गर किंग इंडिया लि.चा ‘आयपीओ’ येत्या २ ते ४ डिसेंबर दरम्यान विक्रीसाठी येत आहे. रु. ८१० कोटींचा हा इश्यू असून, रु. ५९-६० हा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे.

क्विक रेस्टॉरंट चेन मॉडेलमध्ये ही कंपनी काम करते व देशात २०० हून अधिक ठिकाणी त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. मॅक्डोनाल्ड्सप्रमाणेच यांची खाद्य उत्पादने जसे की बर्गर, फ्रेंच फ्राइज आदी विक्रीला असतात.

कंपनी दिसते तोट्यात
स्वतःच्या नावाचा ब्रँड व सप्लाय चेन, अनुभवी व व्यावसायिक व्यवस्थापन आदी कंपनीची बलस्थाने आहेत. परंतु, मागील तीन वर्षांचा आर्थिक लेखाजोखा बघितला, तर विक्री रु. ३८८ कोटींवरून रु. ८४६ कोटी इतकी वाढली. परंतु, निव्वळ नफा न दिसता २०१८ मध्ये रु. ८२ कोटींचे नुकसान, तर २०२० मध्ये रु. ७६.५ कोटी इतके नुकसान दिसते. त्यामुळे साहजिकच ‘ईपीएस’ उणे २.८७ प्रतिशेअर इतके आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थोडे सबुरीने घेणे इष्ट!
देशाची लोकसंख्या बघता पुढील काळात असा व्यवसाय नक्की वाढत राहणार, हे दिसते आहे. त्यानुसार २०२६ पर्यंत क्विक रेस्टॉरंटची संख्या ७०० पर्यंत नेण्याचा कंपनीचा उद्देश आहे. परंतु, ज्याच्या आधारावर बाजारात आडाखे बांधले जातात, ते म्हणजे कंपनीचे आर्थिक निकाल! तेच मजबूत नसतील तर थोडे सबुरीने घेणे इष्ट असते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सध्या या इश्‍यूपासून दूरच राहिलेले बरे असे वाटते. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी जो राखीव कोटा आहे, तो फक्त १० टक्के इतकाच आहे. त्यामुळे ठरविलेल्या कोट्याच्या जास्त पटीत शेअरसाठी नोंदणी झाल्याचे चित्र दिसू शकते. परंतु, आर्थिक निकालांवर डोळा ठेवूनच निर्णय घेणे योग्य ठरेल.

तेजी असेल तर चांगले ‘लिस्टिंग’
सध्या ‘निफ्टी’ अतिउच्चांकी स्तरावर आहे. केवळ आठ महिन्यांत ७५०० अंशांवरून १३००० म्हणजे ७३ टक्के इतका वर गेला आहे. थोडक्यात, तेजीमधून प्रवास ‘युफोरिया’कडे जाऊ लागला आहे की काय, अशी शंका येते. दुय्यम बाजारात हा शेअर १४ डिसेंबरला ‘लिस्ट’ होणार आहे. तोपर्यंत अशीच तेजी राहिली तर शेअर वरच्या भावपातळीला देखील ‘लिस्ट’ होऊ शकतो. पण, तात्पर्य असे की, जास्त जोखीम घेण्याची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांनीच इश्‍यूसाठी नोंदणी करावी. इतरांनी योग्य संधीची वाट बघून मगच भागीदार व्हायचे की नाही, याचा निर्णय घ्यावा.  

(डिस्क्लेमर - लेखिका ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत. तिने तिच्या अभ्यासातून वरील अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी शेअर बाजारातील जोखीम ओळखून स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Maharashtra Assembly Election 2024 Results : सांगली जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’ने भाजपची ‘मविआ’ला धोबीपछाड

SCROLL FOR NEXT