एअरोस्पेस आणि डिफेन्स सेक्टरमधील दिग्गज कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबाबत (Bharat Electronics Ltd) अनेक तज्ज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय त्यांची कमाई अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. कंपनीची बॅलन्स सीट मजबूत आहे. कंपनी नॉन-डिफेन्स सेक्टरमध्येही आपला फोकस वाढवत आहे. एक्सपोर्ट आणि सर्व्हिसेस बिझनेसवर कंपनीचे लक्ष आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा (Bharat Electronics Ltd) आऊटलूक चांगला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने या स्टॉकवर खरेदीचे मत (buy rating) दिले आहे. 12-18 महिन्यांसाठी यात पैसे गुंतवता येतील असा सल्लाही त्यांनी दिला.
टारगेट - 290 रुपये
ICICI Direct ने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडवर (Bharat Electronics Ltd) खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच, प्रति शेअर टारगेट 290 रुपये ठेवण्यात आले आहे. 3 जून 2022 रोजी स्टॉक 242 रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपासून सुमारे 10 टक्के परतावा मिळू शकतो. कंपनीची बॅलेन्सशीट मजबूत आहे. कंपनीकडे FY23-24E मध्ये मजबूत ऑर्डर पाइपलाइन आहे. एक्सपोर्ट आणि सेवा वाढवण्यावर कंपनीचा भर आहे. FY22-FY24E मध्ये, कंपनीचा महसूल सुमारे 16.8 टक्के आणि EBITDA 14.4 टक्के CAGR ने वाढू शकतो.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
BEL मध्ये डबल डिजिट रेव्हेन्यू, ऑर्डर इनफ्लो ग्रोथ अपेक्षित असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कंपनी आपले मार्जिन राखू शकते. मजबूत ऑर्डर बुकमुळे चांगली कामगिरी अपेक्षित आहे. लाँग टर्मसाठी पॉझिटीव्ह दृष्टीकोन आहे तसेच या शेअर्सवर खरेदीचे मत (Buy Rating) कायम ठेवण्यात आले आहे. तर टारगेट 290 रुपये प्रति शेअर आहे.
गेल्या एका वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 58 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, जानेवारी 2022 पासून, स्टॉकमध्ये सुमारे 15 टक्के वाढ झाली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.