Central Govt Instructions State govt Union Territories keep eye on tur dal stocks Heavy rain Damage to turdal crops mumbai sakal
अर्थविश्व

तुरीच्या साठ्यावर लक्ष ठेवा; केंद्र सरकारचे राज्य, केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

अतिवृष्टीमुळे देशभरात तूरडाळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवृष्टीमुळे देशभरात तूरडाळीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे तुरीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी तूरडाळीच्या किमतीत वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ४७ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली. परिणामी तूर पेरणीत ११ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तूरडाळीची किरकोळ किंमत १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास होती, परंतु सध्या डाळीचे भाव १११ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. वाढलेल्या डाळीच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरी झाले आहेत. देशात तूरडाळीचे वाढलेले भाव पाहता केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तूरडाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याबरोबरच राज्यातील व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या डाळीच्या साठ्याची माहिती केंद्र सरकारला देण्यास सांगितले आहे. यासोबत राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलार्इन मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागेल. याशिवाय केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

बफर स्टॉक बाजारात

येणाऱ्या सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्राने बफर स्टॉकमध्ये ठेवलेली ३८ लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तीन लाख टन हरभऱ्याचाही समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT