'कॅश फॉर लोन' घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या चंदा कोचर या एकेकाळी प्रसिद्ध बँकर होत्या. त्यांनी आयसीआयसीआय बँकेला देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सीबीआयने अटक केल्यानंतर आता त्या पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत चंदा कोचर यांच नाव होत. परंतु व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेने केलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआयने बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली.
कोचर दाम्पत्याला शनिवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला 26 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. दोघेही उत्तर देण्यास टाळाटाळ करत असून तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?
व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात चंदा कचोर यांच्या कथित भूमिकेबद्दल तक्रार मिळाल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने मे 2018 मध्ये कोचर यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. हा वाद अधिकच चिघळल्याने कोचर रजेवर गेल्या आणि त्यांनी लवकर निवृत्तीसाठी अर्ज केला आणि तो मान्य करण्यात आला.
1984 मध्ये ICICI मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम सुरू :
कोचर यांनी 1984 मध्ये आयसीआयसीआयमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केले. यानंतर, 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ICICI एक व्यावसायिक बँक बनली. 2009 मध्ये कामत यांच्यानंतर एमडी आणि मुख्य कार्यकारी म्हणून त्यांची निवड झाली.
तपास एजन्सी लवकरच या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये व्हिडिओकॉन समूहाच्या वेणुगोपाल धूत यांच्यासह कोचर यांचेही नाव असू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.