अर्थविश्व

बॅंक, पीएफच्या नियमात बुधवारपासून बदल; जाणून घ्या नियमावली

नीलेश डाखोरे

नागपूर : केंद्र सरकारने एक सप्टेंबरपासून नियमात काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. बँक, पीएफच्या नियमात बदल होणार आहे. ऑनलाइन शॉपिंग महागणार असताना इतरही काही गोष्टीत फेरबदल होणार आहेत. ५० हजारांपेक्षा अधिकचा चेक जारी करण्यासाठी काही नियमही पाळावे लागणार आहेत.

चेक क्लिअरिंग सिस्टिम

सप्टेंबरपासून ५० हजारांपेक्षा जास्तीचा चेक जारी करण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. बहुतांश बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टिम (पीपीएस) लागू करण्यास सुरवात केली आहे. अधिकतर बँकांमध्ये एक सप्टेंबरपासून पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. बँकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

पीएफ नियमातही होणार बदल

आधार कार्ड ईपीएफ खात्याशी लिंक करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना त्यांच्या यूएएन क्रमांकाशी आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे आहे. आधार कार्ड आणि पीएफ खाते लिंक करण्याची तारीख एक सप्टेंबर अखेरची तारीख आहे. तुमचा आधार क्रमांक यूएएनशी लिंक नसेल तर काम केल्यानंतरही तुम्ही पीएफ खात्यात पैसे जमा करू शकणार नाही.

ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन महागणार

आता डिस्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन एक सप्टेंबरपासून महागणार आहे. यानंतर युजर्सना बेस प्लॅनसाठी ३९९ ऐवजी ४९९ रुपये द्यावे लागतील. याशिवाय ८९९ च्या सब्सक्रिप्शनमध्ये ग्राहक दोन फोनमध्ये हॉटस्टार वापरू शकतील, या सब्सक्रिप्शनमध्ये एचडी क्वालिटी मिळेल. शिवाय १,४९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये चार स्क्रीनवर ॲप वापरता येणार आहे.

या ॲप्सवर येणार निर्बंध

गुगलच्या नव्या पॉलिसीनुसार फेक कंटेंट प्रमोट करणाऱ्या ॲप्सवर एक सप्टेंबरपासून निर्बंध येणार आहे. ॲप डेव्हलपर्सकडून दीर्घकाळापासून न वापरण्यात येणाऱ्या ॲप्सना ब्लॉक करण्यात येईल. गुगल प्ले स्टोअरच्या नियमांना आधीपेक्षा अधिक कठोर करण्यात आले आहे. गुगल ड्राईव्ह १३ सप्टेंबर रोजी ग्राहकांना नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल, त्यामुळे याचा वापर अधिक सुरक्षित होणार आहे.

ऑनलाइन शॉपिंग महागणार

डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढल्याने ॲमेझॉन लॉजिस्टिकने किमतीत वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून ॲमेझॉनवरून शॉपिंग महागण्याची शक्यता आहे.

गाड्याच्या किंमती महागणार

मद्रास उच्च न्यायालयाने एक सप्टेंबरपासून सर्व वाहन खरेदीवर बंपर-टू-बंपर इन्शुरन्स अनिवार्य करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे एक सप्टेंबरपासून गाड्यांच्या किमती वाढणार आहेत. बंपर-टू-बंपर इन्शुरन्स हा पाच वर्षांसाठी असून यामध्ये ड्रायव्हर, पॅसेंजर आणि वाहन मालकांना कव्हर करणाऱ्या इन्शुरन्स व्यतिरिक्त असेल.

कार खरेदी महाग

मद्रास उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता कार खरेदी महाग होणार आहे. त्यामुळे आता कोणतीही कार खरेदी करण्यासाठी दहा ते बारा हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. टू व्हीलरसाठी एक हजार रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. सध्या फोर व्हीलरसाठी तीन वर्षांचा तर टू व्हीलरसाठी दोन वर्षांचा इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या या ताज्या निर्णयानुसार आता पाच वर्षांपर्यंत बंपर-टू-बंपर इन्शुरन्स बंधनकारक करण्यात आले आहे.

काय आहे बंपर-टू-बंपरइन्शुरन्स?

बंपर-टू-बंपर इन्शुरन्समध्ये कार किंवा कोणत्याही गाडीला पूर्ण इन्शुरन्स कव्हरेज मिळते. या इन्शुरन्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गाडीच्या नुकसान झालेल्या प्रत्येक पार्टचे पेमेंट केले जाते. म्हणजे गाडीला १०० टक्के इन्शुरन्स कव्हर मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT