fixed deposit sakal
अर्थविश्व

फिक्स्ड इन्कमसोबत टॅक्सही वाचवायचा आहे ? मग बँकांच्या या काही स्कीम्स नक्की पाहा...

सुमित बागुल

Tax saving FDs: जर तुम्ही फिक्स्ड इन्कम सोबत टॅक्सही कसा वाचवायचा याचा विचार करत असाल तर बँकेच्या टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करु शकता. यात 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर इन्कम टॅक्‍स च्या सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स डिडक्शन क्लेम करता येऊ शकतो. टॅक्‍स सेव्हिंग एफडी मध्ये 5 वर्षांसाठी लॉक इन पीरियड असतो. यात सॅलराईड एम्‍प्‍लॉइजसाठी हा अत्यंत सेफ ऑप्‍शन आहे. SBI, PNB, HDFC बँक आणि ICICI बँक 5 वर्षांच्या टॅक्‍स सेव्हिंग एफडीवर किती व्याज ऑफर करत आहेत जाणून घेऊयात. (SBI, HDFC Bank, ICICI Bank to BoB — Special FD scheme to end soon. Check details)

SBI: 5 वर्षांसाठीची एफडी

एसबीआय 5 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 5.40 टक्के व्याज ऑफर करत आहे. सिनियर सिटीझन्ससाठी हाच दर 6.20 टक्के इतका आहे. हे व्याजदर 8 जानेवारी 2021 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी राशीवर लागू आहे.

HDFC बँक 5 वर्षांची एफडी

एचडीएफसी बँक 5 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 5.30 टक्के व्याज देते आहे. सिनियर सिटीझन्ससाठी व्याज दर 5.80 आहे. हे व्याज दर 2 कोटीपेक्षा कमी राशीवर 21 मे 2021 पासून लागू आहेत.

PNB: 5 वर्षांची एफडी

पंजाब नॅशनल बँक (PNB) 5 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 5.30 टक्के का व्याज ऑफर करत आहे. सिनियर सिटीझन्ससाठी हेच दर 5.80 टक्के आहेत. हे व्याजदर मे 2021 पासून 2 कोटीपेक्षा कमी राशीवर लागू आहेत.

ICICI बँक: 5 वर्षांची एफडी

आयसीआयसीआय बँक 5 वर्षांच्या एफडीवर वार्षिक 5.35 टक्के व्याज ऑफर करत आहे. सिनियर सिटीझन्ससाठी हेच व्याजदर 5.85 टक्के इतके आहेत. 2 कोटीपेक्षा कमी राशीवर हे व्याजदर 21 ऑक्टोबर 2020 पासून लागू आहेत.

टॅक्‍स सेव्हिंग FD चे फायदे

टॅक्‍स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटला अत्ंयत सुरक्षित मानले जाते. धोका न पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. टॅक्‍स सेव्हिंग एफडीवर सेक्‍शन 80C मध्ये टॅक्‍स सूट मिळते. FD तून मिळणारे व्याज मात्र टॅक्‍सेबल आहे. यात एका फायनांशियल इयर मध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर टॅक्स वाचवता येतो. यात 5 वर्षांचा लॉक इन पीरियड असतो. पण हा पिरियड 10 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT