china sakal
अर्थविश्व

चीनमधील रियल इस्टेटचा बुडबुडा

चिनी बांधकाम उद्योग प्रतिकूलतेच्या गर्तेत आहे.

सनत्कुमार कोल्हटकर

चिनी बांधकाम उद्योग प्रतिकूलतेच्या गर्तेत आहे. महाकाय ‘एव्हरग्रान्ड कंपनी’ने ३०० अब्ज डॉलरचे कर्ज थकवले आहे. सरकार तेथे कोणते धोरण स्वीकारते, हे महत्त्वाचे ठरेल.

चीनमधील बांधकाम क्षेत्रातील सुमारे ३०० कंपन्या दिवाळखोर झालेल्या असून, त्याचा आवाका प्रचंड आहे. एव्हरग्रान्ड या चीनमधील बांधकाम क्षेत्रातील सर्वांत मोठ्या कंपनीचे ३०० अब्ज डॉलरचे कर्ज थकलेले आहे. ती रियल इस्टेट क्षेत्रातील महाकाय कंपनी आहे. ३०० अब्ज डॉलर ही चीनच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) २ टक्के रक्कम आहे. एव्हरग्रान्डचे मुख्य कार्यालय शँजें वोंगदोंग येथे आहे. चीनमधील २०० शहरांमध्ये कंपनीची कार्यालये आहेत. कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांत मिळून दोन लाखांवर कर्मचारी आहेत. अनेक नवीन इमारतींची बांधकाम कंपनीने थांबवलेली आहेत. सामान्य गुंतवणूकदार ताबा घेण्यासाठी, सदनिका बांधून कधी पूर्ण होईल या विवंचनेत आहेत. गुंतवलेल्या रकमेच्या परताव्यासाठी आक्रोश करताहेत. चिनी सरकारने १४ अब्ज डॉलरद्वारे मदतीचा हात पुढे केला असला तरी ती रक्कम तुटपुंजी आहे.

बांधकाम सामग्री आणि इतर व्यवसायातील पुरवठादारांना देण्यासाठी पैसे नसल्याने ही वेळ एव्हरग्रान्डवर ओढवली आहे. कंपनी परदेशी गुंतवणूकदारांच्या शोधात आहे. या वर्षात कंपनीचे व्यापारी मूल्य सुमारे ७० टक्क्यांनी घटले. थोडक्यात, चिनी बांधकाम कंपन्यांसाठी ‘ऑल इज नॉट वेल’ अशी स्थिती आहे. परकी गुंतवणूकदारांनी ७ अब्ज डॉलरच्या बॉण्डमार्फत केलेल्या गुंतवणुकीची भरपाई त्यांना लवकरच करावी लागेल. जॉर्ज सोरोस या अमेरिकास्थित उद्योगपतीने बांधकाम कंपन्यांच्या दिवाळखोरीने चीनची अर्थव्यवस्था कोसळेल, असे भाकीत केले आहे. ज्या अमेरिकी उद्योगपतीने १९९२ मध्ये बँक ऑफ इंग्लंडला घाम फोडला, त्या सोरोस यांनी नुकतेच चीनमधील बांधकाम क्षेत्र, तेथील कंपन्या आणि त्यांची कर्जाची प्रचंड थकबाकी बघता मोठी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेतील ब्लॅक रॉक ही कंपनी चीनमधील अशा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करते. त्याबद्दल सोरोस यांनी ब्लॅक रॉक स्वतःचे भांडवल गमावेलच; पण त्याचे दुष्परिणाम जगातील इतर देशांतील गुंतवणुकीवर होतील, अशी भीती व्यक्त केली आहे. अनेक हेज फंड्सनी आपापला गुंतवणुकीचा हात आखडता घेतला आहे. एव्हरग्रान्डच्या शेअर बाजारातील बॉण्ड्सचे रेटिंगही घटलेले आहे. जगप्रसिद्ध मूडी या संस्थेच्या म्हणण्यानुसार, एव्हरग्रान्ड दिवाळखोरीजवळ पोहोचलेली किंवा जवळ जवळ दिवाळखोर म्हणता येईल, अशी कंपनी झालेली आहे. मूडीने चीनमधील दुसरी बांधकाम कंपनी गँझाऊ आर अँड एफ या कंपनीचेही रेटिंग घटविले आहे.

अमेरिकेतील गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते चीनमधील सरकार एव्हरग्रान्डला काहीही मदत न करता डुबू देईल. पण याचा चीनच्या एकूण अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. सध्या अध्यक्ष शी जिनपिंग यांनी साम्यवादी विचारप्रणालीवर आधारित ‘सामान्य जनतेचे उत्थान’ संकल्पनेवर काम करण्याचे ठरविल्याने ते एव्हरग्रान्डला मदत करणार नाहीत, अशी लक्षणे आहेत. १३ अब्ज अमेरिकन डॉलर एवढे कर्ज बुडितखाती जाणार आहे. यामागे चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून मागील वर्षी जे धोरण बदलण्यात आले, त्यामुळे तोटा वाढल्याचे सांगण्यात येते. शी जिनपिंग सरकार एव्हरग्रान्डच्या या दिवाळखोरीमध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे सांगतात. क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप करणाऱ्या बँकांवर चीन सरकारतर्फे कडक बंधने आणली जातील, अशी लक्षणे आहेत. चिनी सरकारने तेथील बँकांना सांगून कर्जफेडीसाठी कालमर्यादा कदाचित वाढवून दिली तरीही नंतर काय हा प्रश्न आहे. ‘टाइम विकली’ या चिनी वृत्तपत्रानेच ही बातमी छापली आहे. एव्हरग्रान्ड कंपनीचे ॲसेट ते लायबिलिटी गुणोत्तर ८२ टक्के. डेबीट रेशो १९९ टक्के आहे. या कंपनीत १२८ बँकिंग आणि १२१ नॉन बँकिंग कंपन्यांचे पैसे अडकलेले आहेत. या कंपनीची काही बँकातील खाती गोठविलेली आहेत. कंपनीच्या कर्जांना मुदतवाढ द्यावी, असे चीनमधील अनेक मुख्य बँकांनी कर्जदार बँकांना सुचविले आहे.

अँट ग्रुप या चीनमधील दुसऱ्या महाकाय कंपनीच्या अली पे या कर्ज देणाऱ्या उपकंपनीच्या अनेक कंपन्यांमध्ये विभक्तीकरणाचा चीनच्या सरकारचा इरादा आहे. या महाकाय कंपन्या म्हणजे चीनच्या सरकारच्या दृष्टीने नाकापेक्षा मोती जड असल्याने सत्ताधीशांनी हा निर्णय घेतला असावा, असे दिसते. अमेरिकेमध्येही दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेच्या सरकारला तेथील महाकाय एक्सॉन तेल कंपनीच्या दादागिरीला संपविण्यासाठी तिच्या अनेक उपकंपन्या कराव्या लागल्या होत्या.

आपत्तींवर आपत्ती

एव्हरग्रान्डने बांधकाम चालू असणाऱ्या प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांचे वेतन थकविले आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील व्यापारी आणि एकूणच बिघडलेले संबंध, कोरोनाचा चिनी अर्थव्यवस्थेवरील परिणाम, गेले दोन महिने चीनमधील अनेक प्रांतातल्या महापुराच्या थैमानामुळे चिनी बँका अडचणीत आहेत. सरकारला एव्हरग्रान्डमध्ये बरेच मोठे भांडवल ओतावे लागेल, अशीच चिन्हे आहेत. चीनमधील रियल इस्टेट कंपन्यांचा बुडबुडा फुटण्याच्या मार्गावर आहे. २००८ मध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेत तेथील रियल इस्टेट कंपन्यांचा बुडबुडा फुटला; त्याच पद्धतीने चीनमधील या क्षेत्रातील कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. या सर्व गोष्टींच्या परिणामी चीनमधील रियल इस्टेटच्या किमती जोरदार घसरूही शकतात. एव्हरग्रान्डने नुकतेच कंपनीच्या भांडवल उपलब्धता, रोखीची तरलता आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी बाह्य आर्थिक सल्लागार नेमले आहेत. २००८मध्ये लेहमन ब्रदर्स कंपनी ज्या दिवाळखोरीसाठी अमेरिकेत प्रसिद्ध झाली होती, त्याच कारणासाठी एव्हरग्रान्डही अमर्याद दिवाळखोरीने सध्या गाजत आहे.

शिक्षण संस्थाही गोत्यात

चीनमधील ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था बुडीत खाती निघून दिवाळखोर झाल्या आहेत. यातील सर्व कंपन्या या वर्षाच्या सुरुवातीला अब्जाधीश होत्या. पण सरकारने त्यांना चीनबाहेरील देशांमधून भांडवल आणण्यास मनाई केल्याने अडचणीत आल्या. ज्या पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी या संस्थांमध्ये प्रचंड फी अगोदरच भरलेली होती, ती परत देण्यासही या संस्थांनी नकार दिलाय. चीनमधील कम्युनिस्ट सरकारचे विचित्र धोरण याला कारणीभूत असल्याचे दिसते. कम्युनिस्ट विचारसरणीनुसार गरीब लोकांना श्रीमंत करता येत नसेल, तर श्रीमंतांना पुरेपूर गरीब करून टाका, हा या धोरणामागचा संदेश असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT