लोकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडतं, ज्यात पैसे गमावण्याचा धोका कमी असतो.
Gram Suraksha Scheme : लोकांना अशा योजनांमध्ये गुंतवणूक करायला आवडतं, ज्यात पैसे गमावण्याचा धोका कमी असतो आणि चांगला परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिसची (Post Department) ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Scheme) हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. 19 ते 55 वयोगटातील लोक ही विमा योजना खरेदी करू शकतात. या योजनेतील विम्याची रक्कम 10,000 ते 10 लाखांपर्यंत आहे.
बंद पॉलिसी (Policy) सुरू होईल : प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक आधारावर जमा करता येते. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पेमेंट करण्यात चूक झाल्यास, बंद केलेली पॉलिसी प्रीमियम जमा करून पुनर्जीवित केली जाऊ शकते. ग्राहकांना प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी आहे. ग्राम सुरक्षा योजना बोनससह रकमेची हमी देते, जी एकतर 80 वर्षांची झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यास (जे आधी असेल) त्यांच्या कायदेशीर वारस/नामांकित व्यक्तीला मिळते. ग्राहक 3 वर्षांनंतर पॉलिसी बंद करण्याचा निर्णय देखील घेऊ शकतात, परंतु त्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणार नाही.
तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखांची पॉलिसी खरेदी केल्यास 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1,411 रुपये मासिक प्रीमियम असेल. पॉलिसी खरेदी करणाऱ्याला 55 वर्षांसाठी 31.60 लाख, 58 वर्षांसाठी 33.40 लाख आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मिळतील. म्हणजेच, दररोज 47 रुपये जमा केल्यास तुम्हाला 35 लाख मिळू शकतील.
या विमा योजनेत (Insurance Plan) ग्राहकांना पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनी कर्ज घेण्याची सुविधा मिळते, तसेच पोस्ट ऑफिस ग्राहकांना बोनसही देते. गेल्या वर्षी प्रत्येक 1000 रुपयांमागे 65 रुपये बोनस मिळाला होता.
नामनिर्देशित व्यक्तीचं नाव किंवा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर यांसारख्या इतर तपशीलांमध्ये कोणतेही अपडेट असल्यास, ग्राहक त्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतो. इतर प्रश्नांसाठी ग्राहक दिलेल्या टोल-फ्री हेल्पलाइनवर 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइटवर http://www.postallifeinsurance.gov.in देखील संपर्क साधू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.