SBI Bank Strike SBI alert : नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मार्च एंडपूर्वी आर्थिक व्यवहाराची कामे शिल्लक असताना अचानक बँक कर्मचारी संघटनांनी दोन दिवस संप पुकारला आहे. जर तुमचे बँके व्यवहाराचे कोणते काम राहिले असेल तर येत्या तीन दिवसांमध्ये उरका कारण या महिन्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये उरलेल्या एका आठवड्यात ४ दिवस बँक बंद असणार आहे.
देशातील सर्वात मोठी बँक SBI (SBI) ने ही माहिती दिली आहे. ''बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सर्वसामान्यांना खूप त्रास होऊ शकतो. ''(Complete You Work in three days,Casus SBI Bank employees strike on 28 and 29 march)
बँक संघटनांनी २८ आणि २९ मार्चला (सोमवार आणि मंगळवार) संपाची घोषणा केली आहे.दरम्यान महिन्यातील चौथा शनिवार असल्याने २६ मार्चला आणि २७ मार्चला साप्ताहिक सुटीमुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. याचा अर्थ या महिन्यात चार दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.
देशव्यापी संपात 'यांचा' समावेश असेल
SBI ने बँक ऑफ इंडिया असोसिएशनच्या (IBA) माहितीनुसार सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण आणि बँक कायदा दुरुस्ती विधेयक-2021 विरोधात बँक कर्मचाऱ्यांच्यावतीने 28 आणि 29 मार्चला दोन दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) यांनी देशभरात संपावर जाण्याच्या निर्णयाची माहिती देणार्या नोटिसा जारी केल्या आहेत.
कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे
एसबीआयने सांगितले की, सं''पाच्या दिवसांमध्ये बँकेने आपल्या शाखा आणि कार्यालयांचे कामकाज सामान्यपणे चालावे यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. मात्र या संपामुळे बँकेच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना सेवा देण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.''
एप्रिलमध्ये बँकाही १५ दिवस बंद राहणार आहेत
एप्रिलमध्ये अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत. म्हणजे अनेक दिवस बँका बंद राहतील. तुमचे बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते मार्चमध्ये पूर्ण करा किंवा एप्रिलमधील सुट्ट्या लक्षात घेऊन बँकिंगशी संबंधित काम करा. पुढील महिन्यात गुढी पाडवा, आंबेडकर जयंती आणि बैसाखी या सणांमुळे देशभरातील बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. RBI ने एप्रिल 2022 साठी बँक सुट्टीची यादी जारी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.