मुंबई : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारांमध्येही (Indian share market) खरेदी झाली व शेअरबाजार निर्देशांक (coordinates increases) सलग तिसऱ्या दिवशी वाढले. सेन्सेक्स (Sensex) 672.71 अंश तर निफ्टी (Nifty) 179.55 अंश वाढला. सेन्सेक्स आता साठ हजारांच्या टप्प्यात आला आहे. (coordinates increases in share market on third day also Sensex nearby sixty thousand)
आज दिवसअखेर सेन्सेक्स 59,855.93 अंशांवर तर निफ्टी 17,805.25 अंशांवर स्थिरावला. आज निफ्टीमधील प्रमुख 50 शेअरपैकी 35 चे भाव वाढले. तर सेन्सेक्सच्या 30 प्रमुख शेअरपैकी फक्त पाच शेअर तोट्यात होते. त्यातही अल्ट्राटेक सिमेंट 72 रुपयांनी घसरून 7649 रुपयांवर आला. त्याशिवाय सनफार्मा, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब व इन्फोसिस हे शेअर फक्त 90 पैसे ते 17 रुपये असे किरकोळ घसरले. त्याखेरीज उरलेल्या 25 शेअरचे भाव वाढले.
रिलायन्स इंडस्ट्रीज 53 रुपयांनी वाढून 2,457 रुपयांवर तर टायटन 55 रुपयांनी वाढून 2579 रुपयांवर गेला. टीसीएस देखील 64 रुपयांनी वाढून 3,882 रुपयांपर्यंत पोहोचला. हिंदुस्थान युनिलीव्हर, बजाज फायनान्स, एचडीएफसी, मारुती, नेस्ले, लार्सन अँड टुब्रो, बजाज फीनसर्व्ह या शेअरचे भाव वाढले.
आजचे सोन्याचांदीचे भाव
सोने - 49,260 रु.
चांदी - 61,700 रु.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.