कॉसमॉस को-ऑप बँक आणि कॉसमॉस को-ऑप बॅंक सेवक संघ यांच्यात झालेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ देण्यात आली आहे.
पुणे - कॉसमॉस को-ऑप बँक (Cosmos Co-op. bank) आणि कॉसमॉस को-ऑप बॅंक सेवक संघ यांच्यात झालेल्या करारानुसार (Agreement) कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ (Increment) देण्यात आली आहे.
कॉसमॉस को-ऑप बँक आणि कॉसमॉस को-ऑप बॅंक सेवक संघ यांच्यात नुकताच सन २०२० ते २०२५ या कालावधीकरिता कर्मचाऱ्यांसाठी वेतन वाढीचा करार करण्यात आला. सेवक प्रतिनिधी उमेश दातार यांनी या कराराबाबत सविस्तर माहिती दिली, त्यानुसार सेवकांच्या पगारात १० टक्के इतकी भरघोस वाढ देण्यात आली आहे. एकूण वाढीपैकी ६० टक्के वाढ ही कायमस्वरुपी असून ४० टक्के वाढ ही कामगिरीवर (परफॉरर्मन्स) आधारित राहणार आहे. १ एप्रिल २०२२ पासून सेवेची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सेवकास २५ हजार रुपये लॉयल्टी बोनसही देण्यात येणार आहे.
कॉसमॉस बॅंक व्यवस्थापन व कॉसमॉस बॅंक सेवक संघात झालेल्या या करारामधे बँक कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्जासह इतर सर्व कर्ज योजना सवलतीच्या व्याजदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फेस्टिवल अलाऊन्स, वैद्यकीय विमा, रिटायरमेंट बेनिफिट शा विविध सुविधांचा समावेशही या करारात करण्यात आला आहे.
कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे म्हणाले, 'योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बँक पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व संचालक प्रयत्न करत आहोत.'
सेवक वेतन कराराच्या निमित्ताने झालेल्या या समारंभामध्ये बँकेतर्फे समूह अध्यक्ष डॉ. मुकुंद अभ्यंकर, उपाध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे, वेतन समितीचे अध्यक्ष सीए प्रविणकुमार गांधी, संचालक सीए यशवंत कासार, सचिन आपटे, मिलिंद पोकळे, अॅड. अनुराधा गडाळे, व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, महाव्यवस्थापक अविनाश चव्हाण, कॉसमॉस बॅंक सेवक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर चव्हाण, उमेश बेल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राची घोटकर व बागेश्री जोशी यांनी केले. कॉसमॉस सेवक संघाचे उपाध्यक्ष उदय लेले यांनी आभार मानले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.