create portfolio News: शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी येत्या काळात फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे या अस्थिर (Share Market) वातावरणात दर्जेदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घ्या, जेणेकरुन तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन मदत करतील. आयआयएफएल सिक्युरिटीजचे (Social Media) संचालक संजीव भसीन तुमच्यासाठी काही उत्तम स्टॉक घेऊन आले आहेत.
कोणते शेअर्स देतील तगडा परतावा ?
एचडीएफसी एएमसी, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी आउटपरफॉर्म करत असल्याचे बाजार तज्ज्ञ संजीव भसीन म्हणाले. तर HDFC लाइफ जुलै फ्यूचर आणि कोफोर्ज जुलै फ्यूचरचा विचार करायचा सल्ला त्यांनी दिला आहे. एचडीएफसी लाइफ जुलै फ्यूचरचे शेअर्स घेण्याचा सल्ला दिला कारण त्यात एम्बेड व्हॅल्यू आणि फायदे आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी एचडीएफसी लाइफ जुलै फ्युचरमध्ये (HDFC Life July Future) पैसे गुंतवण्याची उत्तम संधी आहे. तर संजीव भसीन यांनी दुसरी निवड कोफॉर्ज जुलै फ्युचरची (Coforge July Future) केली आहे. मिडकॅप आयटी जुलै महिन्यात चांगली कामगिरी करणार आहे. अशा परिस्थितीत ही वेळ गुंतवणुकीसाठी योग्य असल्याचे ते म्हणाले.
एचडीएफसी लाइफ जुलै फ्युचर (HDFC Life July Future)
सीएमपी (CMP) - 547.55 रुपये
टारगेट (Target) - 575 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 530 रुपये
कोफॉर्ज जुलै फ्युचर (Coforge July Future)
सीएमपी (CMP) - 3678.00 रुपये
टारगेट (Target) - 3850 रुपये
स्टॉप लॉस (Stop Loss) - 3600 रुपये
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.