credit card Sakal
अर्थविश्व

एकापेक्षा जास्त Credit Card वापरताय? या गोष्टींकडे लक्ष द्या

सुमित बागुल

Credit Card Tips: प्रत्येकाच्याच मनात क्रेडिट कार्ड्सविषयी अनेक शंका –कुशंका असतात. क्रेडिट कार्ड घ्यावे की नाही इथपासून किती घ्यावे असे अनेक प्रश्न, त्याविषयी जाणून घेऊयात.

Credit Card Tips: प्रत्येकाच्याच मनात क्रेडिट कार्ड्सविषयी अनेक शंका –कुशंका असतात. क्रेडिट कार्ड घ्यावे की नाही इथपासून किती घ्यावे असे अनेक प्रश्न, त्याविषयी जाणून घेऊयात.

क्रेडिट कार्ड लिमिट

जेव्हा तुम्ही एक क्रेडिट कार्ड घेता, तेव्हा तुमच्या पगारावरुन क्रेडिट कार्डची लिमिट (Credit Card Limit) ठरवली जाते. कालांतराने तुमचा पगार वाढतो तसा क्रेडिट कार्डचे लिमिटही वाढते. पण अनेकदा बँका क्रेडिट लिमिट वाढवत नाहीत अशावेळी तुम्ही जास्त क्रेडिट लिमिटसाठी अप्लाय करु शकता.

क्रेडिट कार्ड लिमिटचा वापर कसा करता ?

सर्वसाधारणतः क्रेडिट कार्ड लिमिटच्या (Credit Card Limit) 30 टक्केच वापर तुम्ही केला पाहिजे. याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. समजा तुमच्याकडे 1 लाख रुपयांची लिमिट असणारे Credit Card आहे आणि तुम्ही दर महिन्याला 70 हजार खर्च करताय तर तुम्ही क्रेडिट लिमिटच्या 70 टक्के वापर करताय. पण यामुळे तुमचा क्रेडीट स्कोअर खाली येऊ शकतो. अशावेळी तुम्ही एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकता.

नव्या क्रेडिट कार्डमध्ये कोणत्या ऑफर्स मिळतायत ?

जेव्हा तुम्हाला नवे क्रेडिट कार्ड ऑफर (Credit Card Offers) होते तेव्हा सोबत मिळणाऱ्या ऑफर्सही तपासा. जर एखादे क्रेडिट कार्ड तुमच्या मासिक खर्चात बचत करु शकते तर ते नक्की घ्या. जसे की क्रेडिट कार्डावर पेट्रोल भरल्यावर कॅशबॅक मिळत असेल तर असे कार्ड्स तुम्ही घेऊ शकता. एखादा मोठा खर्च समोर असेल, मोठा खर्च येणार असेल तरी तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करु शकता.

एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डमुळे नुकसान

एकापेक्षा जास्त कार्ड्समुळे तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड म्हणजे एकापेक्षा जास्त ड्यू डेट. जर तुम्ही कोणत्याही एका कार्डचे बिल भरायला विसरलात तर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते.

हिडेन चार्जेसकडे लक्ष ठेवा

अनेकदा कंपन्या वार्षिक फीज किवा जास्त व्याजदरांसारख्या गोष्टी हिडेन चार्जेसअंतर्गत (hidden charges) लपवून ठेवतात. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड आहेत, तर अनेक बँका तुम्हाला मोठे कर्ज जसे की होम लोन किंवा ऑटो लोन देण्यास नकार देतात.

(नोट: बातमी ऍक्सिस बँकेच्या ऑफिशियल वेबसाइटवरील आर्टिकलवर आधारित आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT