share market esakal
अर्थविश्व

Share Market : 'हे' 5 स्टॉक देऊ शकतात 68 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा

बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीत काही शेअर्समध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे.

शिल्पा गुजर

बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीत काही शेअर्समध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे.

शेअर बाजाराच्या (Share Market)अस्थिरतेत असे काही स्टॉक्स आहेत, ज्यात लाँग टर्मच्या दृष्टीकोनातून खरेदी आणि गुंतवणूक (Investment) केली जाऊ शकते. जगभरातील बाजारपेठांमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत बाजारावर कायम आहे. बाजारातील नुकत्याच झालेल्या घसरणीत काही शेअर्समध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे. अशात काही शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला ब्रोकरेज हाऊससह शेअर बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 68 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा (Refund) देऊ शकतात.

क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड (CreditAccess Grameen Ltd)-

ब्रोकरेज फर्म ऍक्सिस सिक्‍युरिटीजने क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लिमिटेड (CreditAccess Grameen Ltd) शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 831 रुपयांचे टारगेट दिले आहे. 22 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 800 रुपये आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 31 रुपये किंवा सध्याच्या किंमतीनुसार सुमारे 4 टक्के परतावा मिळू शकतो.

सोभा लिमिटेड (Sobha Ltd)-

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने शोभा लिमिटेडच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 902 रुपये आहे. 22 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 748 रुपये आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 160 रुपये किंवा सध्याच्या किंमतीनुसार सुमारे 21 टक्के परतावा मिळू शकतो.

दोडला डेअरी लिमिटेड (Dodla Dairy Ltd)-

ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दोडला डेअरी लिमिटेडच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 615 रुपयांचे टारगेट दिले आहे. 22 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 530 रुपये आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना 85 रुपये प्रति शेअर किंवा आताच्या किंमतीनुसार सुमारे 16 टक्के परतावा मिळू शकतो.

केमप्लास्ट सनमार लिमिटेड (Chemplast Sanmar Ltd)-

ब्रोकरेज फर्म आयआयएफएलने केमप्‍लास्‍ट सनमार लिमिटेडच्या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी 990 रुपयांचे टारगेट देण्यात आले आहे. 22 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 588 रुपये आहे. म्हणजेच, सध्याच्या किंमतीनुसार, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 402 रुपये किंवा 68 टक्के परतावा मिळू शकतो.

आयसीआयसीआय बँक लिमिटेड (ICICI Bank Ltd)-

ब्रोकरेज फर्म शेअरखानने आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 970 रुपयांचे टारगेट दिले आहे. 22 मार्च 2022 रोजी शेअरची किंमत 712 रुपये आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना 258 रुपये प्रति शेअर किंवा सध्याच्या किंमतीनुसार सुमारे 36 टक्के परतावा मिळू शकतो.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT