डेबिट कार्ड  esakal
अर्थविश्व

क्रेडिट/डेबिट कार्ड हरवल्यास...?

क्रेडिट/डेबिट कार्ड आपल्या पाकिटात ठेवत असतो.

सुधाकर कुलकर्णी

सर्वसाधारणपणे आपण आपले क्रेडिट/डेबिट कार्ड आपल्या पाकिटात ठेवत असतो. आपले पाकीट काही वेळा आपल्या हलगर्जीपणामुळे हरवते किंवा चोरीस जाते. अशा वेळी पाकिटात असलेल्या रोख रकमेसोबत आपले क्रेडिट/डेबिट कार्डसुद्धा जात असते. आजकालच्या डिजिटल पेमेंटच्या जमान्यात पाकिटात रोख रक्कम तशी कमीच असते. मात्र कार्ड गहाळ होण्याने गंभीर समस्या निर्माण होते व यावर तातडीने कार्यवाही करणे अत्यंत जरुरीचे असते. मात्र नेमके काय करणे गरजेचे असते, याची बहुतेकांना माहिती नसते. त्यादृष्टीने आपण माहिती घेऊ.

आपले कार्ड गहाळ झाल्याचे लक्षात येताच त्वरित आपले कार्ड ब्लॉक करा. हे आपल्याला बँकेला फोन करून, नेट बँकिंगला लॉग-इन करून, बँकेचे मोबाईल ॲप असल्यास त्यावरून किंवा बँक जवळ असल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन आपण आपले कार्ड ब्लॉक करू शकता. असे केल्याने आपले कार्ड लगेचच रद्द केले जाऊन पुढील एक ते दोन आठवड्यात आपल्याला नवे कार्ड (नवा नंबर, एक्स्पायरी डेट व सीव्हीव्ही नंबर असलेले) दिले जाते. आपण ऑनलाईन पद्धतीने कार्ड ब्लॉक केल्यास आपले कार्ड ‘ब्लॉक’ झाले असल्याचा ‘एसएमएस’ आपल्या कार्ड व बँकेशी नोंदणी केलेल्या मोबाईलवर येतो. बँकेत प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करून कार्ड ब्लॉक केल्यास बँकेकडून तशी पोहोच आवर्जून घ्यावी.

आपले कार्ड ‘ब्लॉक’ केल्यावर त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनला जाऊन कार्ड हरविल्याची तक्रार नोंदवावी. असे केल्याने गहाळ झालेल्या कार्डवर जर काही व्यवहार झाले, तर त्यास आपण जबाबदार असणार नाही. आजकाल ऑनलाईनसुद्धा ‘एफआयआर’ करता येतो. अशी तक्रार/एफआयआर केल्याने कार्ड हरवल्याचा कायदेशीर पुरावा होतो.

कार्ड गहाळ झाल्यावर लगेचच कार्ड देणाऱ्या कार्ड कंपनीस अथवा बँकेस कळविल्याने संबंधित कंपनी/बँक आपल्या कार्ड खात्यावर ‘फ्रॉड ॲलर्ट’ लावते. यामुळे पुढील गैरव्यवहार होऊ शकत नाहीत.

ही कार्यवाही करून सुद्धा कार्डवर व्यवहार झाल्याचा ‘एसएमएस’ आल्यास त्वरित बँकेस कळवावे, जेणेकरून व्यवहाराची जबाबदारी आपली असणार नाही.

थोडक्यात, आपले कार्ड गहाळ झाल्यास गडबडून न जाता वरीलप्रमाणे कार्यवाही त्वरित केल्यास संभाव्य नुकसान टाळले जाते.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)

प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे!

‘सकाळ मनी’ मासिकाच्या प्रत्येक अंकात शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकिंग, टॅक्सेशन, रिअल इस्टेट, सोने-चांदी, क्रिप्टो करन्सी, आर्थिक नियोजन, निवृत्ती नियोजन आदी विविध विषयांवर तज्ज्ञांचे लेख, मुलाखती प्रसिद्ध होत असतात. त्या पार्श्वभूमीवर आता वाचक वा गुंतवणूकदारांच्या मनातील प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘सकाळ मनी’कडे आलेल्या निवडक प्रश्नांची उत्तरे पुढील अंकात प्रसिद्ध केली जातील. यासंदर्भात वेगळा पत्रव्यवहार केला जाणार नाही. वाचकांनी आपले प्रश्न editor@sakalmoney.com या मेल आयडीवर थोडक्यात पाठवावेत. आपले प्रश्न संक्षिप्त आणि प्रातिनिधिक स्वरुपात असावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT