Petrol-Diesel Price in India: आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या(Crude Oil) किंमती वाढविण्याचा निर्णय ओपेकच्या OPEC (Organization of the Petroleum Exporting Countries) बैठकीत घेण्यात आला. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol- Diesel) किंमती वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान,
पाच राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दरवाढ टळणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. भारत आणि अमेरिकेचा दबाव कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्यासाठी तेल कंपन्यावर दबाव टाकला होता त्यामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले असते तरी त्याचा कोणताही फरक पडलेला नाही. पुरवठा मर्यादित असताना पेट्रोलियम उत्पादनांची मागणी वाढल्याने कच्च्या तेलाचा दर 2014 नंतर प्रथमच गुरुवारी प्रति बॅरल 90 डॉलरच्या वर गेले.
दरम्यान, तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate Today) जाहीर केले आहे. रोज सकाळी 6 वाजता जाहीर होणाऱ्या दरामध्ये आजही कोणतेही बदल केले नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती 95.41 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. मागील तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर तेल कंपन्यांनी वाढवले नाही. (Crude oil prices above 90 for the first time since 2014 will also affect petrol-diesel)
अन्य राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतेही अद्याप बदल झालेले नाही. मुंबईच्या बाबतीत सांगायचे झाले तर, येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये आणि डिझेलची किंमत 94.14 रुपये आहे याशिवाय पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्तामध्ये 104.67 रुपये पेट्रोल व 89.79 रुपये डिझेलच्या किंमत आहे. चेन्नई मध्ये देखील पेट्रोल-डीजलच्या दरामध्ये कोणतेही बदल केले गेले नाहीत. चेन्नई पेट्रोलची दर 101.40 रुपये आणि डिझेलचा दर 91.43 रुपये आहे. याप्रमाणे दिल्ली सोडून तीन महानगरपालिकांमध्ये पेट्रोलचे दर 100 च्या वर आहेत.
नोएडामध्ये पेट्रोल 95.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.01 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 95.28 रुपये आणि डिझेल 86.80 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चंदीगडमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. येथे डिझेल 94.23 रुपये तर डिझेल 80.90 रुपये दराने विकले जात आहे. भोपाळमध्ये पेट्रोल 107.23 रुपये आणि डिझेल 90.87 रुपये आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर: महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 95.41 86.67
मुंबई 109.98 94.14
कोलकाता 104.67 89.79
चेन्नई 101.40 91.43
पेट्रोल-डिझेलचे दर रोज अपडेट होतात
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज किमतींचा आढावा घेऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींची माहिती अपडेट करतात.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर दररोज एसएमएसद्वारे कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 वर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.