Share Market sakal media
अर्थविश्व

क्रूडच्या वाढत्या किमतीने शेअर बाजार घसरलं; रशिया- युक्रेन युद्धाचा फटका

कृष्ण जोशी

मुंबई : रशिया- युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) कच्चा तेलाच्या किमतीत मोठी दरवाढ होत असल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार (Indian share market) पाऊण टक्के घसरले. सेन्सेक्स ३६६.२२ अंश तर निफ्टी १०७.९० अंश घसरला. आज सकाळी आशियाई शेअर बाजार नफा दाखवीत उघडले होते. तर काल अमेरिकी शेअर बाजारही नफा दाखवत बंद झाले होते. त्यामुळे सकाळी भारतीय शेअर बाजारही नफ्यातच उघडले. सकाळी सेन्सेक्सने ५२७.७२ अंशांनी उसळी मारली. यावेळी सेन्सेक्स (Sensex) ५५,९९६.६२ अंश एवढा वर गेला होता. मात्र दुपारी युरोपीयन शेअर बाजार सुरू झाल्यानंतर प्रतिकूल वातावरणामुळे भारतीय शेअर बाजार घसरले. दिवसाखेर सेन्सेक्स ५५,१०२.६८ अंशांवर तर निफ्टी (Nifty) १६,४९८.०५ अंशांवर स्थिरावला.

युक्रेन वरील आक्रमणामुळे अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठयात अडथळे येत असून त्यामुळे त्यात आणखी दरवाढ होण्याची भीती आहे. आजच ब्रेंट क्रूड चे दर प्रती बॅरल मागे ११६.०३ अमेरिकी डॉलर एवढे गेले. त्यातच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारांमधील विक्री सुरूच होती. काल त्यांनी सुमारे सव्वाचार हजार कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

अल्ट्राटेक सिमेंट सहा टक्क्यांनी घसरून ५,९८१ रुपयांवर तर एशियन पेंट सव्वा पाच टक्के घसरून २,८७१ रुपयांवर स्थिरावला. डॉक्टर रेड्डीज लॅब (३,७१९) मारुती (७,५९८) हिंदुस्थान युनिलिव्हर (२,०९१) हे शेअरही अडीच ते साडेतीन टक्के घसरले. आयसीआयसीआय बँक (६९८) बजाज फिनसर्व्ह (१५,७०१) यांचे भावही सव्वा दोन टक्के घसरले. तर दुसरीकडे पॉवर ग्रिड, विप्रो (५६९) टेकमहिंद्र (१,४२७) एचसीएल टेक (१,१३९) यांचे भाव वाढले. टाटा स्टील ची घोडदौड आजही कायम राहिली व त्याने तेराशेचा टप्पा पार करत १,३०३ चा बंद भाव दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT