अर्थविश्व

ब्रिटनची क्रिप्टोकरन्सी बँक 'कॅशा' आता भारतात; एका दिवसासाठी सुद्धा मिळणार कर्ज

विनायक होगाडे

भारतात लवकरच ब्रिटनची एक नवी क्रिप्टोकरंसी बँक (Cryptocurrency) सुरु होणार आहे. क्रिप्टोकरंसी बँक कॅशा (cryptocurrency bank Cashaa) भारतात आपलं कामकाज सुरु करणार आहे. एका रिपोर्टनुसार, कॅशा भारतात बिटकॉईनप्रमाणेच एक व्हर्च्यूअल करन्सी म्हणून काम करेल. येत्या ऑगस्ट महिन्यात या करन्सीचं लाँचिंग होणार आहे. कॅशाचे हे काम पूर्णपणे क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून होणार आहे. जेंव्हापासून ही माहिती समोर आली, तेंव्हापासून भारताच्या आर्थिक बाजारात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'इंडियन एक्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, कॅशाने जगातील पहिली क्रिप्टो फ्रेंडली फायनान्शियल इन्स्टिट्यूशन युनिकासच्या (Unicas) काही शाखा भारतात उघडल्या आहेत. कंपनीने हे काम युनायटेड मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या मदतीने केलं आहे. युनिकास भारतात दोन्ही प्रकारच्या सेवा म्हणजेच क्रिप्टो आणि फिएटशी संबंधित सेवा देणार आहे. ही सेवा सिंगल सेव्हींग अकाउंटवर दिली जाते. कॅशाचे संस्थापक आणि सीईओ कुमार गौरव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

ही नवी क्रिप्टो सेव्हींग, लेंडींग आणि ट्रेडींगच्या सेवा देईल. साधारण १५ ऑगस्टच्या दरम्यान याचं लाँचिंग होणार आहे. लाँचिंग झाल्यानंतर लगेचच बँक युझर्सना बिटकॉईन तसेच इतर क्रिप्टो करन्सीमध्ये फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट करण्याची सेवा देणार आहे. क्रिप्टोमधील या एफडीसाठी एक विशिष्ट मॅच्यूरिटी पीरियड असणार आहे. छोटी छोटी बचत करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

भारतीय रुपये आणि क्रिप्टोकरन्सीसाठी बचत खात्याअंतर्गत कॅशाकडे विविध उत्पादने आहेत. यामध्ये ते वार्षिक 4 टक्के ते 9.67 टक्क्यांपर्यंत व्याज दर देतील. आपण क्रिप्टोकरन्सीमधून कर्जदेखील घेऊ शकता. युनिकास दररोज ०.०4 टक्के दराने व्याज घेतील. हे एका दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी कर्ज घेण्यास देखील परवानगी देते. कॅशाच्या मते, भारतीय बँका क्रिप्टोकरन्सी आणि एक्सचेंजवर कडक कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारतात क्रिप्टो करन्सीवर औपचारिकपणे बंदी घातली गेली नाही. त्यामुळे, एक्सचेंजेस आता फियाट सेवांसाठी कॅशाकडे वळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT