Share Market Sakal
अर्थविश्व

टेक्सटाइल सेक्टरमधील 'हा' शेअर शॉर्ट टर्ममध्ये करेल मालामाल

बाजारखरेदी तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.

शिल्पा गुजर

बाजारखरेदी तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात करण्यासाठी मजबूत स्टॉक निवडला आहे.

शेअर बाजारात (Share Market) सध्या अस्थिरता आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही बाजारातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. बाजारखरेदी तज्ज्ञ संदीप जैन यांनी शेअर बाजारात करण्यासाठी मजबूत स्टॉक (Stock) निवडला आहे. संदीप जैन यांनी खरेदीसाठी दीपक स्पिनर्सची (Deepak Spinners) निवड केली आहे. या शेअरमध्ये शॉर्ट टर्मसाठी खरेदी करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

दीपक स्पिनर्सच का ?

संदिप जैन यांनी या शेअरवर विश्वास व्यक्त केला असतानाच दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनीही या स्टॉकमध्ये पैसे गुंतवले आहेत. ही कंपनी 1982 पासून कार्यरत आहे. कंपनीचे रेटिंग चांगले असून कंपनीवर 61 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. हा टेक्सटाइल कंपनीचा शेअर असून त्याची किंमत 200 कोटी रुपये आहे.

दीपक स्पिनर्स (Deepak Spinners)

- सीएमपी (CMP) - 322 रुपये

- टारगेट (Target) - 350 रुपये

कंपनीचे फंडामेंटल्स ?

दीपक स्पिनर्सचे (Deepak Spinners) स्टॉक 5 च्या PE मल्टीपल वर ट्रेडिंग करत आहे. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीने 9 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता, तर डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 11 कोटी रुपयांचा नफा सादर केला होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

Warora Assembly Election Result 2024 : वरोरामध्ये गुलाल भाजपचाच! करण देवतळे 65170 मतांनी विजयी

Kalyan Rural Election Result 2024 : कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांचा 66 हजार 396 मतांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT