Devyani International IPO: यम ब्रँडची सगळयात मोठी फ्रँचायझी आणि क्विक सर्व्हिस रेस्टोररंट चेनची सगळ्यात मोठी ऑपरेटर देवयानी इंटरनॅशनलच्या IPO चा प्राइस बँड 86-90 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कंपनीचा इश्यू 4 ऑगस्टला खुला होणार आणि 6 ऑगस्टला बंद होणार आहे. कंपनी या इश्यूमधून एकूण 1838 कोटी रुपये जोडण्याच्या प्रयत्नात आहे. यात 440 कोटी रुपयांचे फ्रेश इश्यू जारी केले जातील तर 15,53,33,330 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये विकण्याच्या तयारीत आहे.
Temasek Holdings ची पूर्ण सब्सिडियरी कंपनी Dunearn Investments (Mauritus) Pte. Ltd आणि प्रमोटर RJ कॉर्प कंपनीमध्ये आपली भागीदारी विकणार आहेत. IPO मध्ये 5.5 लाख शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी रिझर्व्ह असतील. इश्यूमधून जमा झालेल्या फंडमधील 324 कोटी रुपयांचा वापर कंपनी थकबाकी चुकवण्यासाठी करणार आहे. ऑफर फॉर सेलचे पैसे कंपनीच्या शेअरहोल्डर्सना मिळतील. कंपनीचे प्रमोटर्स रविकांत जयपुरिया, वरुण जयपुरिया आणि आरजे कॉर्प आहेत. त्यांच्याजवळ Devyani International मध्ये 75.79 टक्के भागीदारी आहे. यम ब्रांड भारतात पिज्जा हट, KFC,बकोस्टा कॉफीसारखे बरेच ब्रँड्स चालवते. ज्याची सगळ्यात मोठी फ्रँचायझी Devyani International आहे.
कोरोना महामारीनंतरही अवघ्या 6 महिन्यात कंपनीने स्टोर नेटवर्क वाढवला आहे. कंपनीने कोअर ब्रँड बिझनेसमध्ये 109 स्टोअर्स ओपन केले आहेत. खोले हैं। याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये ज्युबिलेंट फूडवर्क्स, वेस्टलाइफ डेव्हलपमेंट आणि बर्गर किंग इंडिया आहेत.
यम ब्रँडने 1997 मध्ये DIL ने जयपुर लमध्ये आपल्या पहिल्या पिझ्झा हट स्टोअरसोबत व्यवसायाची सुरुवात केली. सध्या DIL जवळ 296 पिझ्झा हट स्टोअर्स, 264 KFC स्टोअर्स, 44 कोस्टा कॉफी स्टोअर्स आहेत. मार्च 2019 ते 2021 दरम्यान कंपनीच्या कोर ब्रँड स्टोअर्सचा CAGR ग्रोथ 13.58 टक्क्यांवर होता. या इश्यूसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल, CLSA India Pvt Ltd, Edelweiss Financial Services Ltd, Motilal Oswal या इनव्हेस्टमेंट बँकर नियुक्त करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.