आता डिजिटल कर्जदारांची फसवणूक प्रकरणे चिंतेचे कारण बनली आहेत.
Dhani fake loan episode : ॲप बेस्ड डिजिटल लेंडर्स (digital lenders) यांच्या छळामुळे झालेल्या आत्महत्यांच्या प्रकरणांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कठोर निर्णय घेत नवीन नियम तयार केले. पण, आता डिजिटल कर्जदारांची फसवणूक प्रकरणे चिंतेचे कारण बनली आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, याचे बळी सामान्य ग्राहक होते. ही फसवणूक प्रामुख्याने महत्त्वाच्या वैयक्तिक खात्याची (Personal account) माहिती लीक होण्याशी संबंधित होती. इंडियाबुल्सच्या मालकीच्या धानी लोन्स अँड सर्व्हिसेस अॅपचा (Dhani Loans and Services app) समावेश असलेल्या या नव्या प्रकरणाने समस्येत भर घातली आहे आणि डिजिटल कर्ज देणाऱ्या जगातील त्रुटी उघड केल्या आहेत.
प्रकरण नेमकं काय आहे ?
गेल्या काही दिवसांत, अनेक युजर्सने त्यांच्या पॅनकार्डच्या माहितीचा धानी ॲपच्या प्लॅटफॉर्मवर अज्ञात लोकांकडून गैरवापर केल्याची तक्रार केली आहे, काहींनी कलेक्शन एजंट्सद्वारे घेतलेल्या कर्जासाठी कारणे दाखवा नोटीस (show cause notice) पाठवल्याबद्दल तक्रार केली आहे, जे त्यांनी कधीही घेतलेलेच नाही. क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत असल्याच्याही युजर्सच्या तक्रारी आहेत.
गंभीर समस्या
यावरून डेटा चोरी आणि आर्थिक फसवणुकीचे संकेत मिळतात. अर्थात, फसवणूक करून कर्ज घेतल्याचे प्रकरण समोर आले असून, हा अत्यंत गंभीर आरोप आहे. कर्जाची परतफेड न केल्यास, कलेक्शन एजंट पॅन कार्डच्या मूळ मालकांना त्रास देण्यास सुरुवात करतात. प्रभावित झालेल्यांमध्ये अभिनेत्री सनी लिओनचा समावेश आहे, तिच्या नावे बनावट कर्ज घेण्यासाठी आयडेंटिटी चोरीचा आरोप सनीने केला आहे.
धानी (Dhani) म्हणणे काय ?
"ॲपवरील फिनटेक ऑपरेशन्सद्वारे कर्ज मिळविण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी इतर कोणाचे तरी पॅन कार्ड आणि ओळखीचा वापर केल्याची काही प्रकरणे आमच्या माहितीत आली असल्याचे."धानी यांचे प्रवक्ते म्हणाले. आम्ही या प्रकरणांमध्ये आवश्यक पावले उचलली आहेत आणि सर्व तक्रारदारांशी बोलत आहोत. आम्ही क्रेडिट ब्युरोसह त्याचे रेकॉर्ड देखील दुरुस्त करत आहोत. “आयडेंटिटी चोरीच्या घटना वाढत आहेत. आमची रिस्क मॅनेजमेंट आणि टेक टीम काम करत आहे. आम्ही आणखी मजबूत सिस्टम विकसित करत आहोत, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल असे धानीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पण, धानी ग्लोबल सिक्युरिटी प्लॅटफॉर्म जी-डिफेन्सशी जोडली असतानाही डेटा लीक कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरं तर हे एकमेव प्रकरण नाही. सेंट्रल बँक डिजिटल चलन सुरू करण्याच्या तयारीत आहे आणि यात डिजिटल फसवणूक आणि सायबर फसवणूक अशी दोन आव्हाने समोर असल्याचे आरबीआयने अलीकडेच कबूल केले.
आरबीआयसमोर नवीन आव्हाने
नव्या युगात बँकिंग चॅनेलसाठी डिजिटल फसवणूक अनेक आव्हाने उभी करतात. कंपन्यांना व्यवसायासोबत या आव्हानांना तोंड द्यावे लागेल आणि डेटा चोरी, गैरवापर रोखण्यासाठी त्यांचे तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सुधारावे लागतील. या वर्षी जानेवारीमध्ये RBI ने यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक फिनटेक विभाग तयार केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.