Dhirubhai Ambani Birthday : रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे देशातील सर्वात मोठी कंपनी. 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेल्या या दिग्गज कंपनीचा व्यवसाय आज अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
आज 28 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीची पायाभरणी करणारे दिवंगत धीरूभाई अंबानी यांची जयंती आहे. धीरूभाईंचा करिअरचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा आहे, ज्यात अनेक चढ-उतार आहेत. या खास दिवशी त्यांच्या मनोरंजक प्रवासावर एक नजर टाकूया.
1932 मध्ये जुनागडमध्ये जन्म :
धीरूभाई अंबानी (पूर्ण नाव धीरजलाल हिराचंद अंबानी) यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि घरची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती.
अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी दहावीनंतरच नोकरी करून पैसे कमवायला सुरुवात केली. पण त्यांची सुरुवातीची कमाई अपुरी होती.
पेट्रोल पंपावर 300 रुपये पगाराची नोकरी :
त्यांना अभ्यासाची आवड नव्हती, तर वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ते 1949 मध्ये पैसे कमवण्यासाठी देशाबाहेर गेले. धीरूभाई येमेनमध्ये त्यांचे भाऊ रमणिकलाल यांच्याकडे गेले, तेथे त्यांना पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली.
या नोकरीत त्यांना महिन्याला 300 रुपये पगार मिळत असे. 'ए. बेसी अँड कंपनी' मध्ये त्यांनी परिश्रमपूर्वक काम केले आणि त्यांच्या कामावर खूश होऊन कंपनीने त्यांना फिलिंग स्टेशनचे व्यवस्थापक बनवण्यात आले.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
या पेट्रोल पंपावर काम करत असतानाच धीरूभाईंनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. हे स्वप्न घेऊन ते पाच वर्षांनी 1954 मध्ये भारतात परतले. काही दिवस घरी राहिल्यानंतर त्यांनी खिशात 500 रुपये घेऊन ते मायानगरी मुंबईमध्ये आले.
मुंबईत येण्यापूर्वीच धीरूभाई अंबानी यांनी बाजाराची बरीच माहिती गोळा केली होती. खिशात फक्त 500 रुपये असले तरी त्यांच्या मनात अनेक व्यावसायिक कल्पना होत्या.
आतापर्यंत त्यांना हे समजले होते की, पॉलिस्टरला भारतात आणि भारतीय मसाल्यांना परदेशात सर्वाधिक मागणी आहे. त्यानंतर त्यांनी या क्षेत्रात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
रिलायन्स कंपनीची सुरूवात :
या व्यवसायाच्या कल्पनेतून त्यांनी 8 मे 1973 रोजी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन या नावाने आपली कंपनी सुरू केली. याद्वारे भारतीय मसाले परदेशात आणि परदेशी पॉलिस्टर भारतात विकले जात होते.
अशा प्रकारे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचला गेला. व्यवसायाला गती मिळाल्यावर धीरूभाईंनी मागे वळून पाहिले नाही.
2000 मध्ये देशातील सर्वात श्रीमंत बनले :
रिलायन्स कंपनी जेंव्हा सुरू झाली तेव्हा धीरूभाई अंबानी 350 स्क्वेअर फूट ऑफिसमध्ये (खोली) फक्त एक टेबल, तीन खुर्च्या, दोन सहकारी आणि एक टेलिफोन होता.
त्यांनी त्यांच्या एका लेखात नमूद केले आहे की, ते कधीही 10 तासांपेक्षा जास्त काम करत नव्हते. सन 2000 मध्ये अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही उदयास आले.
धीरूभाई लाइम लाईटपासून दूर :
कॉर्पोरेट क्षेत्रात यशाचा झेंडा रोवणारे धीरूभाई अंबानी प्रसिद्धीपासून दूर राहिले आणि त्यांना पार्टी करणे अजिबात आवडत नसे.
दिवसभर काम केल्यानंतर ते दररोजची संध्याकाळ कुटुंबासोबत घालवत असे. कधीकधी ते व्यवसायाच्या कामासाठी देशाबाहेर जाण्याची जबाबदारी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर द्यायचे.
2002 मध्ये निधन :
धीरूभाई अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी मुंबईतील रूग्णालयात त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिनी फुटल्याने निधन झाले. यानंतर त्यांनी उभारलेल्या प्रचंड व्यावसायिक साम्राज्याची जबाबदारी त्यांची दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी घेतली.
मोठा मुलगा मुकेश अंबानी आज जगातील आठव्या क्रमांकाचा आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. ते बर्याच काळापासून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय सातत्याने वाढत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.