Petrol Price News : महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याच वेळी, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमत दीर्घकाळापासून स्थिर आहेत, परंतु स्थिर उंचीवर आहेत. त्यातूनही लवकर दिलासा मिळेल असे वाटत नाही.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रविवारी सांगितले की, सरकारी तेल कंपन्यांचे मागील नुकसान पाहता लवकरच पेट्रोलच्या दरात कपात होण्याची शक्यता नाही.
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील 3 मोठ्या सरकारी कंपन्यांनी गेल्या 15 महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केलेला नाही. यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.
गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने कंपन्यांवरील दबाव काहीसा कमी झाला आहे. मात्र मागील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात केलेली नाही.
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एका अहवालात म्हटले होते की, सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलमधून प्रति लिटर 10 रुपये नफा मिळत आहे. त्याच वेळी, डिझेलवरील तोटा 6.5 रुपये प्रति लिटरवर आला आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर कंपन्यांनी घेतली जबाबदारी :
हरदीप सिंग पुरी म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असतानाही तेल कंपन्यांनी जबाबदारी घेतली. कंपन्यांनी किरकोळ किंमती वाढवल्या नाहीत. सरकारने त्यांना भाव स्थिर ठेवण्यास सांगितले नाही. त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
पीटीआयच्या वृत्तानुसार, वाराणसीतील एका कार्यक्रमादरम्यान हरदीप सिंग पुरी म्हणाले की, नुकसान भरून निघाल्यानंतर किंमती कमी व्हाव्यात अशी आशा आहे.
हरदीप सिंग पुरी म्हणाले की, किंमती स्थिर ठेवल्याने या कंपन्यांना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 21,201.18 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या नुकसानीची भरपाई होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
जून 2022 मध्ये कंपन्यांच्या खर्चात प्रचंड वाढ :
ते म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धानंतर कच्चे तेल जास्त किंमतीने खरेदी केल्याने त्याची किंमत वाढली. जून 2022 अखेर त्यांना पेट्रोलसाठी 17.4 रुपये आणि डिझेलवर 27.2 रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी 6 एप्रिल 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये शेवटची सुधारणा केली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.