Dogecoin meme cryptocurrencyसाठी टेस्ला आणि SpaceX चे मालक एलॉन मस्क यांचे समर्थन कोणापासूनही लपलेले नाही. मस्क हे डॉजकॉइनच्या सुरुवातीपासूनच समर्थक आहेत आणि त्यांची विधाने अनेकदा या नाण्याच्या किंमतीवर परिणाम करतात. पुन्हा एकदा एलॉन मस्कने DOGE बद्दल ट्विट केले, ज्याचा Dogecoin च्या किंमतीवर मोठा प्रभाव झाला आहे.
एलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या मुलाला शिबा इनू कुत्रे खूप आवडतात. येथे तुम्ही शिबा इनू नाण्यावरून त्याचा अर्थ घेऊ नये. वास्तविक डॉजकॉइन ही शिबा इनू कुत्र्याच्या जातीवर आधारित एक मेम क्रिप्टोकरन्सी आहे आणि एलोन मस्कयांनी या ट्विटमध्ये उल्लेख केलेला शिबा इनू डॉजकॉइनच्या लोगोमध्ये दिसलेल्या शिबा इनू कुत्र्याशी संबंधित आहे. मस्कच्या या ट्विटचा परिणाम थेट डॉजकॉइनच्या किमतीवर दिसून आला आणि नाण्याच्या किमतीत मोठी उसळी आली.
शिबा इनू नावाच्या या ट्विटनंतर डॉजकॉइनची किंमत लगेचच 4% वाढली. ट्विटमध्ये मस्कने लिहिले की, "XAEA-XII Doges कुत्रे खूप आवडतात". येथे Doges द्वारे त्याचा अर्थ Dogecoin असा होतो. ट्विटमध्ये एका व्हिडिओचा उल्लेख आहे ज्यामध्ये त्याचा मुलगा अनेक शिबा इनू कुत्र्यांसह खेळत आहे. याआधीही एलॉन मस्क यांच्या ट्विटनंतर डॉजकॉइनच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती.
यापूर्वी मस्कने फ्लोकी इनूचा फोटो ट्विटरवर पोस्ट करण्याचे आश्वासन दिले होते. फ्लोकी इनू हे एलॉन मस्क यांच्या शिबा इनू कुत्र्याचे नाव आहे. त्याच धर्तीवर फ्लोकी इनू मीम कॉईन देखील बनवण्यात आले आहे. मस्कच्या ट्विटनंतर फ्लोकी इनूच्या किमतीने जबरदस्त उसळी मारली आणि त्यात अचानक 16% वाढ झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.