Cryptocurrency sakal media
अर्थविश्व

क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींना भुलू नका, सावध राहा

जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने नोव्हेंबर 2021 पासून जवळपास 47 टक्के गमावले आहे.

शिल्पा गुजर

CoinDCX वर आयुष्मान खुरानाची 'फ्यूचर यही है' जाहिरात किंवा CoinSwitch कुबेर वरील रणवीर सिंगची 'कुछ तो बदलेगा' यासह अनेक क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींनी मागच्या वर्षभरात धुमाकूळ घातला. मोठमोठे स्टार्स या जाहीराती करताना दिसले. बरं, या जाहिरातींमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क आहे, याबाबत काही सांगितलेले नाही फक्त खुप पैसा, तगडा परतावा याबाबत हे स्टार्स सांगत होते, त्यामुळेच सेबीने अर्थविषयक संसदीय स्थायी समितीकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. ज्यात सेलिब्रिटींना क्रिप्टोकरन्सीची जाहिरात करण्यास परवानगी देऊ नये असे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार समजत आहे.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी, जाहिरात क्षेत्राच्या सेल्फ-रेग्युलेटरी संस्थेने, Advertising Standards Council of India (ASCI) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्यामध्ये जाहिरातदार आणि सेलिब्रिटींनी क्रिप्टोकरन्सीची जाहिरात कशी करावी हे सांगितले होते. गेल्या वर्षी, अनेक क्रिप्टो-एक्स्चेंजने क्रिप्टो किमतींमध्ये वाढ होत असताना त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. मात्र, यंदा त्यात मोठी घट झाल्याने जाहिरातींच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जगातील सर्वात जुनी आणि लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने नोव्हेंबर 2021 पासून जवळपास 47 टक्के गमावले आहे. त्याच वेळी, दुसरी सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी, इथरियमची किंमत सुमारे 47 टक्क्यांनी कमी झाली आहे. जगातील टॉप-10 क्रिप्टोकरन्सीमधील लुनाची व्हॅल्यू 100 टक्क्यांपेक्षा खाली घसरली आणि हे क्रिप्टो 3,535 रुपयांच्या किमतीसह शून्य रुपयांवर आले आहे.

अभ्यास करुन गुंतवणूक करा
ज्या गुंतवणूकदारांनी बॉलीवूड स्टार्सच्या जाहिराती पाहून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्यासाठी ही घसरण एक मोठा धडा आहे. गेल्या वर्षांत, अनेक भारतीय गुंतवणूकदारांनी जाहिराती पाहुन प्रथमच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, आता त्याला आपले पैसे बुडण्याची चिंता सतावत आहे. त्यामुळेच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी स्वतः अभ्यास करा.

जाहिराती कायमच बरोबर नसतात-

गेल्या वर्षी जेव्हा अनेक बड्या स्टार्सनी क्रिप्टोची जाहिरात करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला फक्त अलर्ट करण्यात आले होते असे एएससीआयच्या सीईओ आणि महासचिव मनीषा कपूर यांनी सांगितले. त्यामुळेच ASCI ने क्रिप्टो जाहिरातींवर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, जी एप्रिल 2022 पासून लागू आहे. गुंतवणुकीच्या जोखमींबद्दल वापरकर्त्यांना कोणतीही माहिती नसताना जाहिराती मोठमोठी आश्वासने देत आहेत, मोठ्या परताव्याबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे क्रिप्टोकरंसीबाबत खूप जोखीम आहे. जगातील सर्व आघाडीच्या अर्थतज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच क्रिप्टोकरंसीच्या जोखमीबद्दल सांगणे खूप महत्त्वाचे ठरते.

एप्रिल 2022 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर, ASCI ला उल्लंघनाचा आरोप करणाऱ्या चार जाहिराती सापडल्या आहेत, ज्या काढून टाकण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, ते 25 जाहिरातींवर लक्ष ठेवून आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT