Dr Virendra Tatke writes about investment opportunities in mutual fund diwali  
अर्थविश्व

दिवाळी रंगे, म्युच्युअल फंडासंगे

भारतीय म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेने नुकताच ३८ लाख कोटींचा बहुचर्चित टप्पा गाठला

-डॉ. वीरेंद्र ताटके

भारतीय म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेने नुकताच ३८ लाख कोटींचा बहुचर्चित टप्पा गाठला

खरं तर, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत यावर्षी दिवाळीपूर्वीच दिवाळी सुरू झाली आहे, असे म्हणता येईल. त्याची कारणेदेखील तशीच आहेत. भारतीय म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेने नुकताच ३८ लाख कोटींचा बहुचर्चित टप्पा गाठला. तसेच म्युच्युअल फंडातील एकूण फोलिओची संख्यादेखील तेरा कोटींच्या पुढे पोहोचली. गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने दिलेल्या उत्तम परताव्यामुळे अनेक नवीन गुंतवणूकदार या गुंतवणूक पर्यायात जोडले जात आहेत. अर्थात, आपल्या देशाची एकूण लोकसंख्या पाहता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अनेक लोकांपर्यंत पोहचण्यास अजूनही मोठा वाव आहे. आपणही आत्तापर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नसेल किंवा आपली गुंतवणूक नियमित नसेल तर या दिवाळीत या गुंतवणुकीचा जरा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करूयात.

लक्ष्मीपूजन : स्थैर्याकडे वाटचाल करा

पैसा कमविण्याची कला अनेकांकडे असते;पण कमवलेला पैसा योग्य पर्यायात गुंतवून कसा वाढवावा हे शिकणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. या दिवाळीच्या निमित्ताने आपण प्रत्येक दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा श्रीगणेशा करूयात. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस! लक्ष्मी ही संपत्तीची देवता मानली जाते, तर कुबेर हा खजिनदार मानला जातो. या निमित्ताने आपण लक्ष्मीची आराधना करून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करायला सुरुवात करूयात. म्युच्युअल फंडातील स्थैर्य प्राप्त होण्यासाठी लार्जकॅप फंड अतिशय उपयोगी पडतात. या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर कामगिरीत सातत्य आणि स्थैर्य असणाऱ्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लार्जकॅप फंडात गुंतवणूक सुरू करूयात आणि त्या गुंतवणुकीतील नियमिततादेखील पाळूयात.

दिवाळी पाडवा : आयुष्यात आणि गुंतवणुकीत समतोल साधा

आयुष्यात येणाऱ्या चढउतारांवर मात करण्यासाठी बॅलन्स्ड अॅप्रोच अर्थात संतुलित दृष्टीकोन अत्यंत आवश्यक असतो. असाच दृष्टीकोन गुंतवणुकीतदेखील आवश्यक असतो. गुंतवणुकीतील जोखीम आणि परतावा यांचा योग्य समतोल साधण्यासाठी बॅलन्स्ड फंडातील गुंतवणूक सुरू करा. असे फंड शेअर बाजाराबरोबरच तुलनेने कमी जोखीम असलेल्या इतर गुंतवणूक पर्यायदेखील गुंतवणूक करतात. या फंडांची शेअर बाजारातील गुंतवणूक आपल्याला अधिक परतावा मिळवून देऊ शकेल, तर इतर पर्यायातील गुंतवणूक आपल्याला सुरक्षितता देईल . थोडक्यात, ज्याप्रमाणे आयुष्यात ज्याप्रमाणे आपण समतोल साधण्याला महत्त्व देतो. त्याप्रमाणेच या निमित्ताने गुंतवणुकीतदेखील समतोल साधण्यावर भर देऊयात.

दिवाळी भाऊबीज : नावीन्यपूर्ण सोने भेट द्या

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला गोल्ड म्युच्युअल फंडाची भेट देण्याचा विचार करा. सराफाकडे जाऊन सोने खरेदी करण्यात आनंद मिळत असला तरी त्यात अनेक तोटे आणि धोके असतात. त्याऐवजी सोपी गुंतवणूक प्रक्रिया, पारदर्शकता, बाजारभावाप्रमाणे खरेदी-विक्रीची हमी हे फायदे देणाऱ्या गोल्ड फंडाची नाविन्यपूर्ण भेट बहिणीला दिल्यास त्यातील गुंतवणुकीतून बहिणीला दीर्घकाळ फायदा होईल.चला तर मग, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्यासंगे आपण दिवाळीच्या आनंदात रंग भरुयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT