HDFC Bank  esakal
अर्थविश्व

HDFC बँकेचे खातेधारक काही तासांसाठी झाले करोडपती; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

HDFC बँकेचे खातेधारक अचानक करोडपती झाले.

सकाळ डिजिटल टीम

आपण करोडपती व्हावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कित्येकांची हयात जाते परंतु त्याचं हे स्वप्न काही पूर्ण होत नाही. परंतु HDFC बँकेचे खातेधारक मात्र अचानक करोडपती झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या खात्यात करोडो रुपये जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. खाती तपासल्यावर या ग्राहकांच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचे दिसले. मात्र, त्यांचा आनंद काही तासांसाठीच राहिला. कारण हे पैसे तांत्रिक बिघाडामुळे खात्यात आल्याचे स्पष्ट झाले.

चेन्नईतील एचडीएफसी बँकेच्या काही ग्राहकांच्या खात्यात लाखो रुपये जमा झाल्याचे आढळून आले. ही बाब सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. बँकेत अचानक आलेल्या या पैशामुळे बँक ग्राहकांनी आयकर विभागाला काय उत्तर द्यावं, हा प्रश्न विचारला जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाचा रिपोर्ट शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, "चेन्नईचे HDFC बँकेचे ग्राहक अचानक करोडपती झाले आहेत. HDFC बँकेत चुका सुरूच आहेत, खात्यात करोडो रुपये जमा झाले आहेत. हे लोक आयटी विभागाला काय उत्तर देतील?" (Due to some technical glitches, HDFC Bank account holders, however, suddenly became millionaires.)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यावर काहींनी मजेशीर कमेंटही केल्या. एका व्यक्तीने लिहिले – माझ्याकडे एचडीएफसी खाते आहे, आशा आहे की एक दिवस मी देखील करोडपती होईन.

अहवालानुसार, एचडीएफसीकडून असे सांगण्यात आले आहे की हे प्रकरण चेन्नईच्या बँक शाखांशी जोडलेल्या काही खात्यांमध्येच समोर आले आहे. रविवारी सकाळी सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. ही बाब निदर्शनास येताच बँकेने या खात्यांवरील व्यवहार तात्काळ स्थगित केले. यापैकी कोणत्याही खात्यातून चुकीच्या पद्धतीने जमा केलेली अतिरिक्त रक्कम काढली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी धनादेशही तपासले जात आहेत.

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अनेक खातेधारकांना त्यांच्या बँक बॅलन्समध्ये अनेक पटींनी वाढ झाल्याचे लक्षात आलं. एका खातेधारकाच्या म्हणण्यानुसार, त्याने त्याचे डेबिट कार्ड वापरून इंधनाची रक्कम भरली असताना, त्याच्या खात्यात त्याने 2.2 कोटी जमा झाल्याचे लक्षात आले. त्यांने स्वतः बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यानंतर त्याचे खाते गोठवण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT