अर्थविश्व

नीरव मोदीची 440 कोटींची जप्त मालमत्ता PNBला परत करण्यास मान्यता

सुमित बागुल

नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँक पीएनबीची 14,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Nirav Modi: ईडीने नीरव मोदीची जप्त केलेली 440 कोटी रुपयांची मालमत्ता पंजाब नॅशनल बँकेला परत करण्यास मान्यता दिली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने पंजाब नॅशनल बँकेला (PNB)440 कोटी रुपयांच्या मालमत्ता परत करण्याची परवानगी दिली आहे. नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सी यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँक पीएनबीची 14,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

विशेष न्यायालयाचे आदेश...

Prevention of Money Laundering Act चे विशेष न्यायाधीश व्ही सी बर्डे यांनी गेल्या आठवड्यात हा आदेश दिला. तपशीलवार ऑर्डर गुरुवारी (19ऑगस्ट, 2021) उपलब्ध झाली. नीरव मोदीच्या दोन कंपन्यांना फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (FDIPL)आणि फायरस्टार इंटरनॅशनल (FIL)यांना क्रेडिट सुविधा पुरवण्यासाठी बँकेकडे गहाण ठेवलेल्या मालमत्ता परत मिळाव्यात, यासाठी पीएनबीने जुलै 2021 मध्ये अनेक अर्ज केले होते. पीएनबीने वैयक्तिक फिर्यादी आणि पीएनबी संघाची मुख्य बँक आणि यूबीआय संघाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला होता.

ED ने जप्त केली होती संपत्ती

न्यायालयाने 108.3 कोटी रुपयांच्या एफआयएल आणि 331.6 कोटी रुपयांच्या एफडीआयपीएलसह मालमत्ता पीएनबीला मंजूर करण्याच्या दोन याचिकांना परवानगी दिली होती. "याचिकाकर्त्या (बँकेला) झालेले नुकसान DRT (Debt Recovery Tribunal) ने स्वीकारले आहे, त्यांनी पीएनबीच्या बाजूने निर्णय दिला आहे."असं न्यायालयाने म्हटले. तपासादरम्यान, ईडीने नीरव मोदीच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या होत्या ज्या त्याने कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून आणि काही कंपन्यांद्वारे मिळवल्या होत्या.

नीरव मोदीच्या अनेक मालमत्ता डिसेंबर2019 मध्ये "फरार आर्थिक गुन्हेगार"(Fugitive economic offender)घोषित केल्यानंतर जप्त करण्यात आल्या. बँक आणि कर्ज देणाऱ्या बँकांच्या संघाने जप्तीला विरोध केला होता, कारण नीरव मोदी आणि चोक्सी यांनी करारपत्रे मिळवण्यासाठी त्यांच्याकडे या मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. जर त्यांना भविष्यात मालमत्ता किंवा त्यांचे मूल्य परत करण्याचे निर्देश दिले गेले तर ते परत करतील असे न्यायालयाने पीएनबीला लिखित स्वरूपात देण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT