EPF Sakal
अर्थविश्व

EPF खात्याला फोन किंवा ईमेल अपडेट करायचाय? जाणून घ्या एका क्लिकवर

तुमचे बँक खाते किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाते अपडेट वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे.

शिल्पा गुजर

तुमचे बँक खाते किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खाते अपडेट वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल रजिस्टर्ड असणे गरजेचे आहेच, शिवाय अपडेटेड असणेही महत्त्वाचे आहे. असे न केल्यास यात मिळणाऱ्या सर्व्हिसेज आणि क्लेम दाखल करण्यात समस्या येऊ शकतात. त्याचबरोबर अनेक सेवांमध्ये विलंबाचाही सामना करावा लागू शकतो.

EPF मध्ये अचूक आणि अपडेट केलेल्या मोबाईल नंबर, नॉमिनेशन आणि कोविड-19 क्लेमसारख्या सर्व्हिसेजमध्ये मदत करतो. त्याचबरोबर इतर महत्त्वाची कामेही कमी वेळेत होतात. यासाठी नोंदणीकृत अर्थात रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी (OTP) पाठवला जातो. त्याचप्रमाणे, अचूक ईमेल आयडीसह ईपीएफओशी संपर्क साधणे सोपे होते.

तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून EPF खात्यातील मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करू शकता.

1. तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून मेंबर सेवा साइटवर लॉग इन करा.

2. 'मॅनेज सेक्शन' मध्ये 'कॉन्टॅक्ट डिटेल्स' पर्याय निवडा.

3. जेव्हा तुम्ही 'कॉन्टॅक्ट डिटेल्स' पर्याय निवडता, तेव्हा तुमच्या स्क्रीनवर लेटेस्ट मोबाइल नंबर आणि ईमेल दिसेल.

4. तुम्हाला ज्यात अपडेशन हवे आहे. तो पर्याय निवडा, जसे की तुमचा फोन नंबर किंवा ईमेल. यानंतर तुम्हाला तुमचा नवीन मोबाइल फोन नंबर आणि ईमेल देण्यास सांगितले जाईल.

5. अपडेट केलेली माहिती एंटर केल्यानंतर, 'Get Authorization PIN' वर क्लिक करा. तुमच्या नवीन मोबाईल नंबरवर आणि/किंवा ईमेलवर 4-अंकी पिन नंबर पाठवला जाईल.

6. पिन टाकल्यानंतर, 'सेव्ह चेंज' वर क्लिक करा.

या बदलांनंतर तुमचे EPF खाते अपडेट केले जाईल.

तुम्ही मेंबर सेवा पोर्टलद्वारे पहिल्यांदाच EPF खाते एक्सेस करत असाल, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर अपडेट करु शकता.

1. मेंबर सेवा पोर्टलवर जा आणि 'UAN ऍक्टिव्हेट करा' या पर्यायावर क्लिक करा.

2. स्क्रीनवर तुमचा UAN, आधार क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करा. हे तपशील EPFO रेकॉर्डमध्ये जसे आहेत तसेच असावेत. UIDAI रेकॉर्डनुसार आधार लिंक केलेला फोन नंबर टाका.

3. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. UAN ऍक्टिव्हेट करायला डिटेल्स देण्यासाठी तुमची संमती द्यावी लागेल. हे डिटेल्स आधारमध्ये जसे आहेत तसे उपलब्ध असतील.

4. नंतर 'ऑथोरायझेशन पिन मिळवा' हा पर्याय निवडा. आता तुमच्या मोबाईलवर 4 अंकी OTP येईल.

UAN ऍक्टिव्हेट झाल्यानंतर, तुम्हाला मोबाईल नंबरवर पासवर्ड दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT