Paytm Stocks: भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Gover) यांनी ट्विटरवर पेटीएम शेअर्सवर खरेदीचा सल्ला देऊन त्यांच्या फॉलोअर्सना आश्चर्यचकित केले. पेटीएमच्या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असताना अश्नीर ग्रोव्हरने आपल्या फॉलोअर्सना हे शेअर्स खरेदी करायचा हा सल्ला दिला आहे.
अश्नीर ग्रोव्हर यांचे ट्विट-
"पेटीएमचे शेअर्स खरेदी करण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. त्याचे मूल्य 7 अब्ज होते. केवळ फंडातून 4.6 अब्ज डॉलर्स उभे केले गेले. कॅश इन हॅन्ड जवळपास 1.5 अब्ज डॉलर असणे आवश्यक आहे. सध्या 600 रुपयांच्या आसपास या शेअरची किंमत आहे, म्हणजेच गेल्या 10 वर्षात 3.1 अब्ज खर्च करून 5.5 अब्ज डॉलर तयार झाले आहेत. हे बँकेच्या एफडी दरापेक्षाही कमी आहे. त्यामुळे हे शेअर्स आता खरेदी करा असे ट्विट अश्र्नीर ग्रोवर यांनी केले आहे. (Expert advice to buy Paytm shares; Find out the opinion of Ashneer Grover)
मात्र, युझर्स हा सल्ला मानायला तयार नसल्याचे दिसून आले. यामागचे एक मोठे कारण म्हणजे पेटीएमचे शेअर्स गेल्या 4 महिन्यांपासून सातत्याने घसरत आहेत. पेटीएमच्या आयपीओची किंमत 2,150 रुपये ठेवण्यात आली होती आणि आज त्याचे शेअर्स जवळपास 70 टक्क्यांच्या खाली व्यवहार करत आहेत
पेटीएमच्या शेअर्समध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीचा परिणाम त्याचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्या संपत्तीवरही झाला असून ते आता अब्जाधीश राहिलेले नाहीत. पेटीएमच्या आयपीओच्या लिस्टिंग वेळी, विजय शेखर शर्माची मालमत्ता 2.35 अब्ज रुपयांवर पोहोचली होती, जी आता 99.9 कोटी डॉलरवर आली आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.