Mutual Fund Investment Tips in Marathi Sakal
अर्थविश्व

Mutual Fund: अर्थसंकल्पानंतर, लार्जकॅप, मिडकॅप फंड्समध्ये मिळेल मजबूत परतावा

एसआयपी गुंतवणूकदारांनी काय करावे ? तज्ज्ञांकडून समजून घ्या...

शिल्पा गुजर

Mutual Fund SIP: बजेटनंतर म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांसाठी चांगल्या गुंतवणुकीच्या संधी बनले आहेत. अर्थसंकल्पाचा (Budget) संपूर्ण भर इंफ्रास्‍ट्रक्‍चर, मॅन्‍युफॅक्‍चरिंग आणि डिजिटलायझेशन मजबूत करण्यावर आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांनी (Investors) त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन फंड्स (Funds) घेणे आणि लाँग टर्मसाठी रिबॅलेन्स करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना लार्जकॅप, मिडकॅप इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याच वेळी, गुंतवणूकदारांना सध्या गिल्ट फंड आणि लिक्विड फंड्सपासून दूर राहणे आवश्यक आहे. (Mutual Fund Investment Tips in Marathi)

लार्जकॅप, मिडकॅप फंड्समध्ये संधी

बजेटमध्ये संपूर्ण लक्ष इंफ्रास्‍ट्रक्‍चरवर असल्याचे वेल्थ मॅनेजमेंट कंपनी फिंटूचे सीईओ मनीष पी. हिंगर म्हणाले. सरकारने कॅपिटल एक्‍सपेंडिचरवर 35 टक्के वाढ केली आहे. इन्फ्रा हे नेहमीच लॉन्‍ग टर्मसाठी चांगले आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीही बाजारात तेजी दिसून आली. याचा अर्थ सर्व उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञ सकारात्मक आहेत. इन्फ्रावर जितका जास्त जोर द्याल तितकी 'मेक इन इंडिया' संकल्पना चांगली होईल. जेव्हा मेक इन इंडिया संकल्पना चांगली होईल तेव्हा ती लाँग टर्ममध्ये चांगला रिटर्न देईल. आता आपण लाँग टर्मच्या रिटर्नचा विचार केला तर पुढच्या 2-3 वर्षांसाठी लार्जकॅप आणि मिडकॅपमध्ये तेजी येऊ शकते. म्हणजेच, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना लार्जकॅप आणि मिडकॅप इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. बजेटमधून इन्फ्राला चालना मिळणार असल्याचे बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम म्हणाले. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आता त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंड्सव्यतिरिक्त टेक्नॉलॉजी फंड आणि मॅन्युफॅक्चरिंग फंड यांचा समावेश करावा. कॅपिटल गुड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडांनाही चांगले पर्याय असल्याचे ते म्हणाले.

SIP गुंतवणूकदारांनी काय करावे?

मनीष पी. हिंगर म्हणाले. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) लॉन्‍ग टर्मासाठी मोठा निधी तयार करतो. विद्यमान गुंतवणूकदारांनी त्यांची एसआयपी सुरु ठेवावी. जर तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये नवीन फंड घ्यायचा असेल तर तुम्ही लार्जकॅप आणि मिडकॅप फंड्सचा समावेश करू शकता. जर तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे पैसे गुंतवलेत तर ते सुरू ठेवा असे ए.के. निगम म्हणाले. प्रत्येक घसरणीदरम्यान नवीन खरेदी करा. बाजारात आणखी वाढ अपेक्षित आहे. सध्या लार्जकॅप, लार्ज आणि मिडकॅप आणि मल्टीकॅप फंड चांगले असल्याचे ते म्हणाले.

या फंड्सपासून दूर राहा

फेडरल रिझर्व्हच्या निर्णयानंतर व्याजदर आणखी वाढणार असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचे मनीष पी. हिंगर म्हणाले. याचा बॉन्‍ड मार्केवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत ज्यांनी सरकारी सुरक्षा (G-Sec) बाँड्स म्हणजेच गिल्ट फंडमध्ये पैसे गुंतवले आहेत, त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे गिल्ट फंडापासून दूर राहा असा सल्ला हिंगर यांनी दिला आहे. यानंतर, पुढील 2-3 महिन्यांसाठी लिक्विड फंड्सही टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. कारण लिक्विड फंडही कुठेतरी रेपो दराने चालतात. जर रेपो रेटमध्ये आणखी बदल झाला तर तुम्हाला लिक्विड फंडांमध्ये फारसा चांगला परतावा मिळणार नाही.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT